उल्हासनगर - नवनियुक्त शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांचे भाजप जिल्हा कार्यालयात आमदार कुमार आयलानी, माजी जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, लाल पंजाबी आदींच्या उपस्थितीत भव्य स्वागत झाले. यावेळी त्यांनी शहर कार्यकारणीत नवीन व तरुण चेहऱ्याला स्थान देणार असल्याचे संकेत दिल्याने, जुन्या स्थानिक नेत्यांची कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर भाजपच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी प्रदीप रामचंदानी यांची निवड झाल्यावर, त्यांचे शनिवारी शहर जिल्हा कार्यालयात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार कुमार आयलानी, माजी शहरजिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, लाल पंजाबी यांच्यासह मनोहर खेमचंदानी, डॉ प्रकाश नाथानी, प्रकाश माखिजा, किशोर वनवारी, राम चार्ली पारवानी, राजू जग्यासी, डॉ एस बी सिंग, दीपक छतलानी, मंगला चांडा, अर्चना करणकाळे, अश्विनी माधवी आदीसह पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे आक्रमक असल्याने, त्यांची शहर कार्यकारणी त्याच तोलामोलाची असणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शहर कार्यकारणीत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणाऱ्या नेत्यांची गच्छंती निश्चित असल्याचे समजले जात आहे.
भाजपच्या जिल्हा कार्यालयातील स्वागत कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी लवकरच शहर कार्यकारणी घोषित करणार असल्याचे संकेत दिले. तसेच कार्यकारिणीत नवीन व तरुण चेहऱ्याला स्थान देणार असल्याचे ते म्हणाले. मात्र शहर जिल्हाकार्यकरणीत वर्षानुवर्षे पदे अडवून बसणाऱ्या स्थानिक नेत्यांची त्यामुळे कोंडी झाली आहे. तसेच शहरात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असून भविष्यात शहरात क्रमांक एकचा पक्ष असेल, असेही रामचंदानी म्हणाले आहेत. रामचंदानी यांच्या निवडीचे सर्वाधिक स्वागत भाजप कार्यकर्ते व तरुण पदाधिकार्यांनी केले आहे.