लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सोनसाखळी जबरी चोरीसाठी उत्तर प्रदेशातून ठाणे ग्रामीणमधील मीरा रोड आणि भार्इंदर भागात आलेल्या अजितसिंग सिंग, यशपाल सिंग, धरमपाल सिंग यांच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी जबरी चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले असून चोरीतील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह चार लाख ५१ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीच्या जबरी चोºया तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये उघडकीस न आलेले खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील पोलिसांना १८ नोव्हेंबर २०१९ रोजी दिले होते. काशिमीरा येथे झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये त्यांनी हे आदेश दिल्यानंतर याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पथकांची निर्मिती केली. अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे आणि विलास कुटे यांच्या पथकाने मीरा रोड आणि काशिमीरा भागातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यात मिळालेल्या दोन मोटारसायकलच्या क्रमांकांच्या आधारे संजय सिंग याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याच चौकशीमध्ये संजय सिंग याच्यासह चौघांना ताब्यात घेतले. उत्तर प्रदेशातून आलेले असल्यामुळे दिवसा लॉजवर वास्तव्य करून रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाºया महिलांच्या सोनसाखळ्या किंवा मंगळसूत्रे मोटारसायकलवरून येऊन जबरीने चोरत असल्याची त्यांनी कबुली दिली. त्यानुसार, त्यांना २ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांना याआधीही २७ सप्टेंबर रोजी ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून मीरा-भार्इंदर विभागातील तीन गुन्हे उघड झाले असून त्यातील २१ हजार ६०० रुपयांचे दागिने आणि मोटारसायकल असा ४१ हजार ६०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.* दिल्लीतून आरोपींकडून सहा गुन्हे उघडसहायक पोलीस निरीक्षक कुटे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या पडताळणीतून राजकुमार मालावत, आशू मालावत, सुनील राजपूत आणि सोनू ऊर्फ भरत जाठव (रा. सर्व नवी दिल्ली) यांना त्याच दरम्यान अटक केली. नवी दिल्ली येथून मीरा रोड परिसरात खास सोनसाखळी चोरीसाठी ही टोळी येत होती. त्यांच्याकडून मीरा-भार्इंदर परिसरातील सहा गुन्हे उघडकीस आले असून त्यातील १५० ग्रॅम वजनाचे चार लाख १० हजारांचे दागिने हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार साळुंखे, विलास कुटे, उपनिरीक्षक चेतन पाटील, जमादार अनिल वेळे, चंद्रकांत पोशिरकर, पोलीस हवालदार संदीप शिंदे, किशोर वाडीले, अर्जून जाधव, पोलीस नाईक अशोक पाटील, संजय शिंदे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, प्रदीप टक्के, मनोज चव्हाण तसेच पोलीस शिपाई राजेश श्रीवास्तव, सतिश जगताप, महेश बेल्हे आणि विकास राजपूत आदींच्या पथकाने अथक परिश्रम करुन यशस्वी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नवी दिल्ली, यूपीमधून येऊन ठाणे ग्रामीणमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला अटक
By जितेंद्र कालेकर | Published: December 09, 2019 10:22 PM
दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून ठाणे ग्रामीणमधील मीरा रोड आणि भार्इंदर भागात आलेल्या अजितसिंग सिंग, यशपाल सिंग आणि धरमपाल सिंग यांच्यासह सात जणांच्या टोळीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी जबरी चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्देसाडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सोनसाखळी चोरीच्या नऊ गुन्ह्यांची उकल