ठाणे : जिल्ह्यातून कोरोनाच्या एक हजार 392 रुग्णांना मंगळवारी शोधून त्यांची नोंद घेण्यात आली आहे. या रुग्णांसह एक लाख 36 हजार 429 रुग्ण आजपर्यंत जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. तर 24 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात तीन हजार 775 मृतांची नोंद आतापर्यंत करण्यात आली, अशी माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने आज दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात 257 नवे रुग्ण सापडले असून यासह शहरात 28 हजार 226 रुग्णांची आजपर्यंत नोंद झाली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 868 झाली आहे. आज कल्याण - डोंबिवली मनपात 405 रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. या शहरात आज सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे या शहरातील मृतांची संख्या 692 झाली. तर 32 हजार 393 रुग्ण बाधीत झाल्याची नोंद आजपर्यंत करण्यात आली आहे. नवी मुंबई परिसरात 265 रुग्णांची नोंद झाली असून दोन रुग्ण आज दगावले आहेत. आता बाधितांची संख्या 28 हजार 810 तर, मृत्यूची संख्या 635 वर गेली आहे. उल्हासनगरला 32 रुग्ण नव्याने आढळले आहेत. या शहरात आतापर्यंत आठ हजार 91 बाधीत रुग्णांची नोंद घेण्यात आली. तर आज तिघा जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 241झाली आहे.
भिवंडी मनपा.कार्यक्षेत्रात 11 रुग्ण नव्याने सापडले असून दोघांचा आज मृत्यू झाला आहे. यासह आजपर्यंत चार हजार 368 बाधीतांची तर 293 मृतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 176 रुग्णांची तर एका मृत्यूची नोंद आज झाली आहे. या शहरात बाधीत संख्या 14 हजार 152 तर, 448 मृतांची नोंद आजपर्यंत करण्यात आली आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या परिसरात 31 रुग्ण नव्याने आढळून आले असून तीन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता पाच हजार 259 बाधीत तर,198 मृतांची आजपर्यंत नोंद झाली आहे. तर बदलापूरमध्ये 38 रुग्ण आज सापडले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण चार हजार 627 झाले आहेत. या शहरात आज एकही मृत्यू झालेला नसल्यामुळे मृत्यूची संख्या 73 आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण परिसरात 170 रुग्णांची आज वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहेत. या गांवपाड्यांत आतापर्यंत दहा हजार 503 बाधीत रुग्णांची तर 327 मृतांची आतापर्यंत नोंद झाली आहे.