ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार १७४ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९४ हजार २३२ वर गेली असून ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता दोन हजार ५९८ झाली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात गुरुवारी कोरोनाचे २५८ रुग्ण नव्याने आढळले. यामुळे शहरात २१ हजार ३४८ बाधित झाले असून १३ जणांच्या मृत्यूने मृतांचा आकडा ६८६ वर पोहोचला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात २०९ रुग्णांची वाढ झाली असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या २१ हजार ६०७ झाली आहे. तर, मृतांची संख्या ४१२ वर गेली आहे.
नवी मुंबईत ३६१ नवे रुग्ण सापडले असून पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आतापर्यंत बाधितांची संख्या १७ हजार ३१८ तर मृतांची ४४६ वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात गुरुवारी एकाचाही मृत्यू झाला नाही. मात्र, २० नवे रुग्ण आढळले. यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या १४७ तर सात हजार ३९ बाधितांची नोंद झाली.भिवंडी महापालिका क्षेत्रात २५ बाधित आढळून आले. तर, तीन मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ७२८ तर मृतांची २१४ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ११ नव्या रुग्णांची भर पडली असून सात जणांच्या मृत्यूने या शहरात आता बाधितांची संख्या नऊ हजार ७५ तर मृतांची २९८ झाली आहे. ग्रामीण भागात ८५ रुग्णांची वाढ झाली, तर सात मृत्यू झाले आहेत.अंबरनाथमध्ये ५० रुग्णच्अंबरनाथमध्ये नव्या ५० रुग्णांची वाढ झाली, तर एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार ७९ तर मृतांची संख्या १६१ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ४७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ९०२ झाली.