ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार 175 रुग्णांची वाढ आज मंगळवारी झाली आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील रुग्ण संंख्या एक लाख 25 हजार 352 झाली आहे. तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या आता तीन हजार 577 झाली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे 224 रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. शहरात 26 हजार 133 कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली आहे. तर आज ही पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे आजपर्यंत 844 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण - डोंबिवली परिसरात 205 रुग्णांची आज वाढ झाली असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 29 हजार 220 रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या 638 झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेत 282 रुग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 26 हजार 431झाली आहे. तर, मृतांची संख्या 595 वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात आज दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 28 नवे रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत मृतांची संख्या 228 तर बाधीत रुग्ण सात हजार 833 झाले आहेत.
भिवंडी महापालिका क्षेत्रात आज फक्त 32 बधीत आढळून आले. तर आज एकाचा ही मृत्यू झाला नाही. आता बाधितांची संख्या चार हजार 219 झाली असून मृतांची संख्या 284 झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये आज 167 रुग्णांची तर, एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या 12 हजार 773 झाली, तर, मृतांची संख्या 422झाली आहे.
अंबरनाथमध्ये आज 34 रुग्णांची वाढ तर, दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. आज बाधितांची संख्या चार हजार 993 झाली. तर, मृतांची संख्या 188 वर गेली आहे. बदलापूरमध्ये 56 रुग्णांची आज नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार 188 झाली. या शहरात आज दोघांचा मृत्यू झाला आहे . त्यामुळे मृत्यूची संख्या 73 झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात 147 रुग्णांची वाढ झाली. आज एक मृत्यू झाला नाही. आता बाधितांची संख्या नऊ हजार 562 आणि मृतांची संख्या आजपर्यंत 305 आहे.