अंबरनाथ /बदलापूर : नव्या महा विकास आघाडीने नागपुरच्या अधिवेशनात निवडणूकीच्या पध्दतीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. जनतेतुन थेट नगराध्यक्ष निवडण्याची कार्यपध्दत आणि दोन वार्डाचे एक पॅनल पध्दत बंद करुन एक वार्ड पध्दत अमलात आणण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचे अद्याप आदेशात रुपांतर न झाल्याने निवडणूक आयोगाने जुन्याच पध्तीने निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांच्या निवडणूका ह्या एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहे. या निवडणूकीसाठी प्रभाग रचना, त्याचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. 2 नोव्हेंबर 2017 रोजी राज्य शासनाने नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतुन करण्याचा निर्णय घेतला आहे तर एक सदस्य प्रभाग पध्दती रद्द करुन बहु सदस्य प्रभाग पध्दती (पॅनल पध्दत) अवलंबली होती. त्या अनुसार राज्यात निवडणूकाही झाल्या. याच आदेशानुसार अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या निवडणूका देखील घेण्यात येणार होते. मात्र राज्यात महा विकास आघाडीचे सरकार येताच नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात बहु सदस्य प्रभाग पध्दती रद्द करण्याचा आणि जनतेतुन थेट नगराध्यक्ष निवडण्याचा आदेश रद्द करुन एक सदस्य प्रभाग पध्दती अवलंबण्याचा निर्णय घेतला. तसेच जनतेतुन नगराध्यक्षाची निवडण न करता नगरसेवकांमधुन नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र नागपुर अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाचे अद्याप आदेशात परिवर्तन झालेले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे हे आदेश अद्याप न गेल्याने निवडणूक आयोगाने आपल्या ठरल्या मुदतीप्रमाणे जुन्याच आदेशानुसार कार्यक्रम जाहीर केला आहे.
निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहिर केला आहे त्यानुसार नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून होण्याचे संकेत आहेत तर बहु सदस्यीय पध्दतीने निवडणूका होण्याचे संकेत आहेत. मात्र राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे आदेशात रुपांतर झाल्यावर निवडणूक आयोग नविन आदेश काढेल की आहे त्या आदेशानुसार निवडणूका घेईल याबाबत दोन्ही शहरात संभ्रम निर्माण झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव हा 17 जानेवारीपयरंत देणो, प्रस्ताव मान्यता 21 जानेवारी, आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्दी 24 जानेवारी, आरक्षण सोडत 27 जानेवारीला काढणो, हरकती आणि सुचनांसाठी 30 जानेवारी, हरकतींवर सुनावणी 11 फेब्रुवारी, अहवाल पाठविणो 14 फेब्रुवारी आणि अंतिम प्रभाग रचनेसह मान्यता द्रणो 18 फेब्रुवारी असा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे.
27 जानेवारीला आरक्षण सोडतअंबरनाथ आणि बदलापूरकरांना प्रभागाच्या आरक्षणाची जी प्रतिक्षाहोती ती प्रतिक्षा आता संपली आहे. 27 जानेवारीला प्रभागांचे आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे 27 जानेवारीला निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र 27 जानेवारीच्या आधी निवडणूक आयोगाकडे राज्य शासनाचा नवीन आदेश न आल्यास नव्या निर्णयानुसार निवडणूका घेणो अवघड जाणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडत होण्या आधी राज्य शासनाचे नवीन आदेश येतात की नाही याची प्रतिक्षा सर्वाना लागुन राहिली आहे.