ठाणे : बाळाला पाचवेळा वेगवेगळ््या लसी देताना ते रडू नये याकरिता एक वर्षाच्या आतील बालकांचा ५ गंभीर आजारांपासून बचाव व्हावा म्हणून शासनाने पेन्टावॅलंट या एकाच नवीन लसीचा डोस बालकांना देण्यास सुरुवात केली. मात्र ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील जेमतेम १२२ बालकांना ही लस देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक शहापूर तालुक्यातील बालकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकतर या लसीबाबत शासनाकडून लोकांमध्ये व्यवस्थित जनजागृती झालेली नाही किंवा पाच वेगवेगळ््या लसी देणाऱ्या कंपन्यांकडून पेन्टावॅलंट लसीचा वापर रोखण्याचे प्रयत्न सुरु असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते २२ नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद येथे पेन्टावॅलंट या लसीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार, राज्यात या लसीचे जिल्हास्तरावर वाटप करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
नव्या पेन्टावॅलंट लसीला अल्प प्रतिसाद
By admin | Published: December 14, 2015 1:13 AM