शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

उंबर्डे प्रकल्पात नवा कचरा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 1:35 AM

येरे माझ्या मागल्या; आधारवाडी डम्पिंगवर पुन्हा ढिगारे

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने उभारलेल्या उंबर्डे कचरा प्रकल्पात नव्याने कचरा घेणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कचरा पुन्हा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरच टाकला जात आहे. कचरासमस्या सोडवण्यासाठी प्रकल्प उभारूनही आधारवाडी डम्पिंग बंद होण्याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे येरे माझ्या मागल्या, अशीच स्थिती कचरा व्यवस्थापनाविषयी दिसून येत आहे.आधारवाडी डम्पिंगवरील कचरा टाकण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे हे डम्पिंग बंद करण्यासाठी मनपाने पर्यायी प्रकल्प उभारले आहेत. त्यापैकी बारावे प्रकल्पाचे काम सुरू आहे. तर, उंबर्डे प्रकल्प हा ३५० मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. मात्र, तो लोकवस्तीपासून जवळ असल्याने दुर्गंधी येत असल्याने तेथील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. तरीही महापालिकेने हा प्रकल्प राबविला आहे.आधारवाडी येथे दररोज ५७० मेट्रीक टनपेक्षा जास्त कचरा टाकला जातो. त्यापैकी २०० टन कचरा उंबर्डे प्रकल्पात प्रक्रियेसाठी टाकला जात होता. त्यामुळे आधारवाडी येथे कमी कचरा टाकला जात होता. परंतु, उंबर्डे कचरा प्रकल्पाचा नागरिकांना त्रास होत असल्याने या प्रकल्पात नव्याने कचरा घेण्याचे काम बंद करण्यात आले आहे. या वृत्ताला प्रशासनानेदेखील दुजोरा दिला आहे. परिणामी, २०० टन कचरा पुन्हा आधारवाडी येथे टाकला जात आहे. दरम्यान, उंबर्डे प्रकल्पात आतापर्यंत टाकलेल्या अडीच हजार मेट्रीक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. मात्र, आधारवाडी डम्पिंगवर पुन्ह कचरा टाकला जात असल्याने ते बंद करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला साध्य करता येणार नाही.कोरोनामुळे डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य पडले मागेआधारवाडी डम्पिंगवरील कचरा बायो मायनिंग पद्धतीने डम्प केला जाईल. तसेच डम्पिंगवर उद्यान फुलविले जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगतानाच हे डम्पिंग मे महिन्यात बंद करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आधारवाडी डम्पिंग बंद करण्याचे लक्ष्य मागे पडले आहे.

टॅग्स :dumpingकचरा