शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

नव्या वर्षात अंबरनाथ, बदलापूर चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:23 AM

नव्या वर्षात प्रत्येकजण काहीना काहीतरी संकल्प करीत असतो. काहींचे पूर्ण होतात, काहींना अपयश येते. पण आता अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेने शहर कचरा मुक्तीसाठी संकल्प केला असून त्यासाठी त्यांनी सकारात्मक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

नव्या वर्षात प्रत्येकजण काहीना काहीतरी संकल्प करीत असतो. काहींचे पूर्ण होतात, काहींना अपयश येते. पण आता अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेने शहर कचरा मुक्तीसाठी संकल्प केला असून त्यासाठी त्यांनी सकारात्मक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती एकत्र आल्यास काय होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. एरवी पालिकेच्या कारभाराने नाके मुरडणारे, बोटे मोडणाऱ्या नागरिकांनीही शहर डम्पिंग मुक्त होणार असल्याने या प्रकल्पाचे स्वागतच केले आहे.ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये कचºयाची समस्या गंभीर झाली आहे. काही महापालिकांकडे स्वत:चे डम्पिंग ग्राउंड नसल्याने भाड्याने जागा घेऊन तेथे कचरा टाकतात. आज अनेक ठिकाणी कचºयाचे डोंगर झाले असून ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत. कचºयाच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिका शास्त्रोक्त पद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावत नसल्याने समस्येने उग्र रूप धारण केले आहे. डम्पिंगसाठी जागा घ्यायची झाली तरी तेथे आधीपासून वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांच्या रोषाला पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागते. यामुळे प्रशासनही कात्रीत सापडल्यासारखे झाले आहे. दुर्गंधी आणि रोगराई पसरत असल्याने बहुतेकवेळा ग्रामस्थ कचºयाच्या गाड्या डम्पिंग ग्राउंडवर जाण्यापासून रोखत असल्याने शहरात ठिकठकिणी कचरा साचून राहतो. महापालिकांची ही परिस्थिती असताना नगरपालिका, ग्रामपंचायतींची काही वेगळे चित्र नाही. ग्रामपंचायती क्षेत्रात तर एखाद्या रस्त्यालाच डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप येते. यामुळे तेथून ये-जा करणाऱ्यांना नाकावर रूमाल ठेवल्याशिवाय जाताच येत नाही, हे वास्तव आहे. मात्र नव्या वर्षात जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर शहरे कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने पावले उचलली असून स्पेनमधील एका कंपनीसोबत करार करून ते प्रकल्प राबविणार आहे. परिणामी ही दोन्ही शहरे नव्या वर्षात चकाचक होतील असे बोलले जात आहे.अंबरनाथ शहराने स्वच्छ भारत अभियानात राज्यात चौथा क्रमांक पटकावित सर्वांचे लक्ष वेधले होते. स्वच्छतेच्या बाबतीत शहरात नवनवीन प्रयोगही सुरु होते. कचरामुक्त शहर, नंतर कचराकुंडीमुक्त शहर यशस्वीपणे राबविल्यावर आता पालिकेने डम्पिंगमुक्त शहराकडे वाटचाल सुरू केली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात बदलापूर शहरालाही सोबत घेण्याचा विचार पुढे आला आहे. प्रत्येक शहराला डम्पिंगचा प्रश्न भेडसावत असताना अंबरनाथ पालिकेने आता डम्पिंगमुक्त शहरासाठीच काम सुरू केले आहे. स्वप्नवत वाटणारी ही मोहीम यशस्वी करण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहे. स्पेनच्या एका कंपनीसोबत या संदर्भात करार करून या कंपनीच्या माध्यमातून शहरातील सर्वच कचºयावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथसमोरील डम्पिंगचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. तर अंबरनाथ पाठोपाठ बदलापूर शहरानेही या प्रकल्पात सहभाग घेतल्यास त्यांचा देखील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे.आज प्रत्येक शहराची मुख्य समस्या म्हणजे डम्पिंग ग्राऊंड आहे. या ग्राउंडवरील कचºयाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक शहर प्रयत्न करीत आहेत. मात्र तरीही डम्पिंगचा प्रश्न सुटलेला नाही. डम्पिंग ग्राउंडची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अंबरनाथ पालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिकेने गेल्या चार वर्षात शहरातील स्वच्छता, कचरा आणि डम्पिंगबाबत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांना यशही आले. मात्र डम्पिंगचा प्रश्न हा प्रत्येकवेळी तात्पुरत्या स्वरुपातच सुटत होता. त्यातच ज्या ठिकाणी डम्पिंग उभारण्यात आले आहे ती जागा राखीव नाही आणि सरकारने पालिकेला जी ३२ एकर जागा डम्पिंगसाठी दिली होती त्या ठिकाणी डम्पिंग उभारण्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढणे शक्य होत नव्हते. या समस्येवर चर्चा सुरु असतांनाच स्पेनमधील लेबलॅन कंपनीच्या शिष्टमंडळाने डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली होती. तसेच शहराच्या समस्येचा आढावा घेतला होता. पाहणीत कंपनीच्या निदर्शनास आले की, शहरात ओला आणि सुका कचरा एकत्र जमा होतो. जे नागरिक ओला आणि सुका कचरा वेगळा करतात त्यांचा देखील कचरा हा सरसकट एकत्रित करुन डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. शहरात कचरा वेगळा केला जात नसल्याने पालिकेने शहरात अनेक कार्यक्रम राबवित ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तसेही होत नाही. यावर कंपनीने पुढाकार घेत शहरात एकत्रित जमा होणाºया कचºयाचे वर्गीकरण करून त्या कचºयावर योग्य प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.राज्यात अनेक प्रकल्प हे घनकचरा व्यवस्थापनेचे उभारण्यात आले आहे. मात्र त्यातून काही ना काही कचरा हा डम्पिंग ग्राउंडवर न्यावा लागतो. मात्र आधुनिक पध्दतीने साकारण्यात आलेल्या या प्रकल्पात शून्य कचरा बाहेर पडत असल्याने डम्पिंग ग्राउंडचा प्रश्नच कायमस्वरुपी मिटणार आहे. मात्र या प्रकल्पाचे स्वरुप पाहता त्यासाठी लागणारा कचरा हा देखील ५०० टनापेक्षा जास्त अपेक्षित आहे. मात्र एवढा कचरा एकट्या अंबरनाथ शहरातून उभारणे शक्य नाही. तसेच अंबरनाथच्या शेजारील शहरांचा कचरा अंबरनाथमध्ये प्रक्रियासाठी आणल्यास त्याला देखील शहरातून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरात कमी क्षमतेचा प्रकल्प राबविण्यावर विचार सुरु आहे. कमीत कमी ३५० टनाचा प्रकल्प राबविणे गरजेचे असल्याने अंबरनाथ पालिकेने या प्रकल्पासाठी बदलापूर शहराला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ शहरात १५० टन कचरा एकत्रित केला जातो. तर बदलापूर शहरात १०० टन कचरा निर्माण होतो.सरासरी दोन्ही शहरांचा कचरा हा २५० टन होत आहे आणि भविष्यात कचºयाचे प्रमाण वाढणार असल्याने या दोन्ही शहरांसाठी ३५० टन कचºयावर प्रक्रिया होईल एवढा मोठा प्रकल्प राबविण्याचा विचार सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यास बदलापूर पालिकेने तत्वत: मान्यही केले आहे. तसेच त्यांनी कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याबबत तयार केलेला प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कचºयावरील प्रक्रिया पध्दत पाहिल्यावर हा प्रकल्प इतर शहरांसाठी देखील प्रेरणादायी होणार हे निश्चित.कचरा वर्गीकरणाची कटकट संपणारअंबरनाथ शहरात सर्व कचरा हा थेट घंटागाडीत टाकला जातो. तर अनेक ठिकाणी कचराकुंडीत कचरा फेकण्यात येतो. त्यामुळे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची शिस्त अंबरनाथकरांना राहिलेली नाही. हीच परिस्थिती बदलापूर शहराच्या बाबतीतही म्हणता येईल. आजही अनेक ठिकाणी सर्व एकत्रित कचरा गोळा केला जातो.कचºयाचे वर्गीकरण होत नसल्याने पालिकेने अनेकदा दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येते. पालिकेने जनप्रबोधन करून कचरा वेगळा करण्याची शिस्त लावण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याचाही कोणताच परिणाम झालेला नाही. त्यामुळे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची कटकट ही नित्याची झाली होती.दोन्ही कचरा वेगळा करता येत नसल्याने पालिकेनेही थेट हा कचरा डम्पिंगवर टाकण्याचा सोपा मार्ग अवलंबला होता. मात्र आता नव्या प्रकल्पामुळे नागरिकांची आणि पालिकेची कचरा वेगळा करण्याची कटकट कमी होणार आहे. या प्रकल्पात सर्व प्रकारच्या कचºयाचे वर्गीकरण होणार असल्याने पालिकेचा त्रास कमी होणार आहे.भविष्यातील अंबरनाथचा विचार करता शहरात हा प्रकल्प महत्वाकांक्षी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे शहर डम्पिंग मुक्त होण्यास मदत होईल. या प्रकल्पासाठी सरकारकडूनही जास्तीतजास्त निधी मिळविण्याचा आमचा प्रयत्न राहिल. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वी केला जाईल.- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार.अंबरनाथ पालिका कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याच्या तयारीत होती. त्यासाठी पालिकेला सरकारकडून अनुदानही मिळाले आहे. त्यामुळे वेळेत हा प्रकल्प सुरू करण्याचा आमचा विचार आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित हा प्रकल्प यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- मनीषा वाळेकर, नगराध्यक्ष.डेब्रिजवरही करता येणार प्रक्रियावाढत्या शहरात इमारतींचे वाया गेलेले बांधकाम साहित्य, इमारत तोडल्यावर निर्माण होणारा कचरा आणि दगड मातीचाही त्रास कमी करणे शक्य होणार आहे. लेबलॉन कंपनीच्या माध्यमातून डेब्रिजवरही प्रक्रिया करणे शक्य आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारावा लागणार आहे. या प्रकल्पात बांधकाम साहित्यातील वाया गेलेले साहित्य टाकल्यावर माती, खडी आणि दगड हे वेगळे करता येणार आहे. त्याचा पूर्ण वापरही करता येणार आहे. त्यामुळे शहरातील डेब्रिजचा प्रश्न निकाली काढता येणार आहे. त्यासाठी १० ते १२ कोटींचा प्रकल्प राबवावा लागणार आहे.प्रकल्पाचा खर्च आवाक्यातकचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्यासाठी सरासरी ८० ते ९० कोटी खर्च अपेक्षित आहे. मात्र त्यापैकी निम्मा खर्च हा संबंधित कंपनीमार्फत केला जाणार आहे. तर उर्वरित ४० ते ४५ कोटी रुपये अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेला द्यावे लागणार आहे. या प्रकल्पासाठी सरकारकडून अनुदानही मिळत असल्याने पालिकेला हा खर्च शक्य होणार आहे. तसेच प्रकल्प उभारल्यावर प्रक्रिया केंद्रासाठी येणारा खर्चही काही प्रमाणात देणे पालिकेला शक्य होणार आहे. मात्र नेमका हा खर्च किती असेल याची कल्पना पालिकांना नसल्याने ते निर्णय प्रक्रियेपर्यंत गेलेले नाही. खर्चाची बाब कशी आहे हे लक्षात आल्यावर पालिकांना या संदर्भात निर्णय घेणे शक्य होणार आहे.धुराच्या त्रासातून होणार मुक्ततागेल्या तीन वर्षात अंबरनाथ शहरात डम्पिंगला आग लागण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. या आगीमुळे परिसरात धूर पसरतो. महामर्गावरील वाहनेही यामुळे दिसेनाशी होतात. डम्पिंगच्या परिसरात नवीन इमारतींची बांधकामे झाली आहेत. त्या ठिकाणी राहणारे नागरिक या डम्पिंगच्या विरोधात सातत्याने आंदोलनही करत होते. मात्र या आंदोलनाचा परिणाम होत नसल्याने ही आग कायम समजत नागरिकांनीही त्रासातच दिवस काढणे मान्य केले होते. हीच परिस्थिती बदलापूरची आहे. मात्र तिथे परिणाम हा एकाच गावाला होत असल्याने संतापाचे वातावरण नाही. मात्र हा धूर पर्यावरणाला आणि नागरिकांना त्रासदायक आहे हे उघड आहे. या धुरातून सुटका करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. स्पेनच्या प्रकल्पामुळे डम्पिंगवर कचरा जाणार नसल्याने तो पेटण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्या प्रकल्पामुळे डम्पिंग आणि धूरमुक्त शहर निर्माण करण्यास मदत होईल.शहरातील कचरा डोकेदुखीअंबरनाथ आणि बदलापूर शहरातील कचरा हा दोन्ही शहरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अंबरनाथ पालिकेचा डम्पिंग ग्राउंड फॉरेस्ट नाका येथे आहे तर बदलापूर पालिकेचे डम्पिंग ग्राउंड हे साई वालिवली येथील दगड खाणीच्या ठिकाणी आहे. अंबरनाथ शहरातील दोन ते तीन प्रभागात ओल्या कचºयापासून गांडूळखत तयार करण्याचा प्रकल्प आहे. तर उर्वरित प्रभागातील सर्व कचरा मात्र थेट घंटागाडीत जातो.ओला आणि सुका कचरा वेगळा होत नसल्याने नाइलाजास्तव सर्व कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकावा लागतो. हीच परिस्थिती बदलापूरातही निर्माण झाली आहे. तिथेही ९० प्रभागात ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. ओला कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा दोन-तीन प्रभागातच नगरसेवकांनी राबवली आहे. त्यामुळे कचºयाचा प्रश्न गंभीर आहे. दोन्ही शहरातील कचरा कोणतीही प्रक्रिया न करता थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो.त्यामुळे पर्यावरणवादींच्या आरोपांचा सामना करण्याची वेळ दोन्ही पालिकांवर आली आहे. कचºयावर प्रक्रिया होत नसल्याने पालिकांवर कारवाईची शक्यताही नाकारता येत नाही. या शहरांना कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारणे अनिवार्य होते. याबाबत पालिकांनी प्रकल्प अहवालही तयार केले होते. मात्र स्पेनच्या कंपनीच्या प्रकल्पाचा विचार केल्यास हा प्रकल्प दोन्ही शहरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.पाच एकर जागेत उभारला प्रकल्पलेबलॅन कंपनीने अंबरनाथ नगरपालिकेच्या शिष्टमंडळाला स्पेनमधील कंपनीच्या घनकचरा प्रकल्पाला भेट देण्याचे आणि त्याचे महत्त्व जाणून घेण्याची संधी दिली. त्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर आणि आरोग्य अधिकारी सुरेश पाटील हेही उपस्थित होते. त्यांनी स्पेनमध्ये जाऊन या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात शहरातील सर्व कचरा वर्गीकरण करुन प्रत्येक कचºयावर वेगवेगळी प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावली जाते.या प्रकल्पाचे महत्त्व म्हणजे ओला आणि सुका कचरा हा एकत्रित आला तरी त्यांची विभागणी यंत्र आणि मनुष्यबळाद्वारे केली जाणार आहे. वेगळ्या झालेल्या कचºयापैकी ओल्या कचºयावर जैविक खत निर्मिती केली जात आहे. सरासरी पाच एकर जागेत हा संपूर्ण प्रकल्प तयार केला गेला आहे. या प्रकल्पात कचºयातील विविध घटक वेगळे होत असल्याने प्रकल्पातून शून्य कचरा बाहेर पडत आहे. सर्वच कचºयावर प्रक्रिया होत असल्याने डम्पिंग ग्राउंडवर कचरा नेण्याची गरज भासत नाही.