ठाणे : ''गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर'' या अशा जयघोषात शनिवारी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला; पण खरोखरच पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येत आहेत. पुढच्या वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असल्याची माहिती पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
शुक्रवारी १० सप्टेंबर रोजी वाजतगाजत लाडक्या गणरायाचे आगमन झाले. शनिवारी ११ सप्टेंबर रोजी दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. गेल्या वर्षी बाप्पाचे आगमन २२ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते. यंदा १९ दिवस उशिरा आगमन झाले; परंतु, पुढच्या वर्षी बाप्पा दहा दिवस लवकर येत आहेत. २०२३ रोजी श्रावण महिना अधिक आल्याने गणरायाचे आगमन उशिरा होत असल्याचे सोमण म्हणाले. दरवर्षी बाप्पा दहा दिवस लवकर येत असल्याचे ते म्हणाले. अडीच ते तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो.
----------------------
पुढील दहा वर्षातील श्री गणेश चतुर्थीचे दिवस
बुधवार : ३१ ऑगस्ट : २०२२
मंगळवार : १९ सप्टेंबर : २०२३
शनिवार : ७ सप्टेंबर : २०२४
बुधवार : २७ ऑगस्ट : २०२५
सोमवार : १४ सप्टेंबर : २०२६
शनिवार : ४ सप्टेंबर : २०२७
बुधवार : २३ ऑगस्ट : २०२८
मंगळवार : ११ सप्टेंबर : २०२९
रविवार : १ सप्टेंबर : २०३०
शनिवार : २० सप्टेंबर : २०३१