सुरेश लोखंडे, ठाणे: भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत आज दि. 6 मे 2024 रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी नऊ उमेदवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, अशी माहिती 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.
23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या खालील उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्रे मागे घेतले आहे.
1.सुमित सुरेश म्हात्रे 2.उमेश जयवंत चौधरी3. पंढरीनाथ ज्ञानेश्वर जाधव4. सुरेश काळूराम जाधव5. मोनिका मोहन पानवे6.डॉ. नुरुद्दीन निजाम अंसारी 7.आकाश दिलीप शर्मा नरेंद्र 8. काना सापळे आणि9. नारायण प्रताप वंगा
नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता प्रत्यक्षात २७ उमेदवार राहणार आहेत.
निवडणूक रिंगणात असलेल्या 27 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे-
राष्ट्रीय पक्षाचे एकूण 3 उमेदवार
1.कपिल मोरेश्वर पाटील....भारतीय जनता पार्टी2.मुमताज अन्सारी... बहुजन समाज पार्टी3.सुरेश गोपीनाथ म्हात्रे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राज्यस्तरीय नोंदणी कृत पक्ष
१.अशोक बाहादरे...सयुंकत भारत पक्ष२.कांचन वाखारे.. न्यू राष्ट्रीय समाज पार्टी.३.दानिश शेख... बहुजन महा पार्टी४.राम सुरेश पांडागले... अपनी प्रजाहित पार्टी५.सैफान चांद पठाण.. भारतीय मानवता पार्टी६.मोहम्मद कलींम अन्सारी.. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक७.मोह.अक्रम अब्दुल खान... AIMIM
एकूण अपक्ष 17 उमेदवार
1.कपिल जयहिंद पाटील. 2. चंद्रकांत मोटे 3. मनीषा गोधळे 4. मनोज तुरे5. मिलिंद काशिनाथ कांबळे6. रंजना त्रिभुवन7. वसीम सिद्दीकी8. विशाल मोरे9. शंकर मुटकिरी10. अमिरुल हसन सय्यद11. जहीद मुख्तार अन्सारी12. हर्षद म्हात्रे 13. तारा पिंट्या वाघे14. सोनाली गंगावणे15. सुरेश सिताराम म्हात्रे16. राहुल काठवले17. निलेश सांबरे