सुरेश लोखंडे
ठाणे : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १३ हजार ७९० शेतकºयांनी भातपिकांचा विमा काढलेला आहे. त्यापोटी त्यांच्या बँक खात्यात तीन दिवसांपूर्वी नऊ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याने संबंधितांमध्ये आनंदोत्सव होत असून, यामुळे त्यांना बºयापैकी आर्थिक पाठबळ मिळाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील शेतकरी या ना त्या कारणांखाली चर्चेत आहेत. अतिपावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पूरस्थितीच्या कालावधीत बहुतांशी शेतकºयांचे पीक वाहून गेले आहे. काही ठिकाणी शेतजमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. याशिवाय कर्जमाफीच्या विषयामुळेही शेतकरी वर्षभरापासून चर्चेत आहेत.
अवेळी पाऊस आणि पडणारा रोग यापासून त्यांचे नुकसान होऊ नये, यावरील उपाययोजना म्हणून पीकविमा काढण्याची सक्ती शेतकºयांवर केली होती. त्यास अनुसरून जिल्ह्यातील १३ हजार ७९० शेतकºयांनी त्यांच्या आठ हजार ५८० हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचा विमा काढलेला आहे. या भातपिकाचे विविध कारणांनी नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यास आता या पीकविम्यांच्या नऊ कोटी १२ लाख रुपयांपासून आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
जिल्ह्यातील २०१९ या खरीप हंगामातील भातपिकाचा विमा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह अन्यही काही बँकांनी शेतकºयांकडून काढला होता. यंदाच्या या साडेआठ हजार हेक्टरवरील भातपिकाच्या विम्यासाठी कर्जदार शेतकºयांना सक्ती करून विमा काढला होता. तर अन्यही शेतकºयांना नुकसानीसंदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करून भातपिकाचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. आता त्यांच्या खात्यात पावसामुळे पडलेल्या भातपिकाच्या विम्याची रक्कम प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात नऊ कोटी १२ लाख रुपये विम्यापोटी जमा झाल्याचे सूतोवाच माने यांनी केले.कर्जमाफीचाही झाला लाभया रकमेसह जिल्ह्यातील १६ हजार १३१ पात्र शेतकºयांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ होत आहे. याद्वारे ९६ कोटी ६० लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी सुमारे १२ हजार ९४१ शेतकºयांचे आधारप्रमाणीकरण झाले आहे. त्यातील सहा हजारपेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होत आहेत. उर्वरित सहा हजार ८४४ शेतकºयांची कर्जमाफीदेखील लवकरच जाहीर होणार आहे.