शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी
2
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
3
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
4
Womens T20 World Cup :२ वर्ल्ड चॅम्पियन्स तर पाटी कोरी असणाऱ्या २ संघांनी गाठली सेमी
5
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
6
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
7
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
8
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडिज महिला उपांत्य फेरीत
9
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
10
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
11
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
12
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
13
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
14
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
15
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
16
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
17
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
18
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
19
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
20
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल

...तर ठामपा करणार नऊ हजार मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 11:57 PM

आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात महापालिकेतील कर्मचारी कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने मालमत्ताकर वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात महापालिकेतील कर्मचारी कामात व्यस्त होणार असल्याने महापालिकेने मालमत्ताकर वसुलीसाठी जप्तीची कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात पालिकेने १० प्रभाग समित्यांमध्ये १७६ ब्लॉक तयार केले असून यामधील जास्तीची थकबाकी असलेल्या प्रत्येक ब्लॉकमधील ५० याप्रमाणे तब्बल आठ हजार ८०० थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. या थकबाकीदारांनी वेळेत मालमत्ताकर भरला नाही, तर ३१ डिसेंबरनंतर त्यांच्यावर जप्तीची कारवाई अटळ असल्याचे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले.मालमत्ताकर विभागाला यंदा ६०० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. सध्या ते ३२५ कोटींचे साध्य केले आहे. परंतु, शिल्लक उद्दिष्टाच्या पार जाण्याची तयारी पालिकेने सुरू केली असून त्यासाठी कर भरण्यासाठी डिसेंबर महिन्यापासूनच सुटीच्या दिवशी कार्यालये खुली ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. असे असतानाच आता पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर निवडणुकीच्या कामात अधिकारी-कर्मचारी व्यस्त होणार असल्याची बाब लक्षात घेऊन प्रशासनाने डिसेंबरअखेरपर्यंत मालमत्ताकराच्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ६०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ५०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे ठरवले असून त्यानुसार प्रयत्नही सुरू केले आहेत.महापालिका क्षेत्रात चार लाख ७० हजारांच्या आसपास मालमत्ताधारक असून त्यांचे १७६ विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे. प्रत्येक विभागात दीड ते अडीच हजार मालमत्ताधारकांचा समावेश आहे. या यादीमधील पहिल्या ५० थकबाकीदारांची यादी तयार केली असून त्यांना दोन दिवसांत मोबाइल संदेश पाठवले जाणार आहेत. त्यानंतर, उर्वरित थकबाकीदारांनाही संदेश पाठवले जातील. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे.>...तर करात दोन टक्के सवलतवसुलीसाठी आॅनलाइनद्वारे कर भरण्यासाठी संकेतस्थळाचा पत्ताही दिला जाणार आहे. तसेच डीजी ठाणे अ‍ॅपवरून करभरणा केल्यास मालमत्ताकराच्या सामान्यकरात मालमत्ताधारकांना 02% सवलत मिळणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. महापालिकेचा मालमत्ताकर अद्याप जमा केलेला नाही. वसुलीची अप्रिय कारवाई (वॉरंट, जप्ती, मालमत्तेची विक्र ी) टाळण्यासाठी तो तत्काळ जमा करावा, अशा स्वरूपाचा मोबाइल संदेश पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये संपूर्ण रक्कम जमा केली असल्यास हा एसएमएस रद्द समजावा, असाही उल्लेख करण्यात येणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत तो पाठवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>थकबाकीदारांना मोबाइलवरून कर भरण्यासंबंधी संदेश पाठवण्यास सुरुवात झाली आहे. सहामाहीतील थकबाकीदार आणि नवीन मालमत्ताधारकांनाही करवसुलीसाठी हे संदेश पाठवले जातील.