ठाणे : शहापूर प्रमाणेच मुरबाड तालुक्यात पाणी टंचाई जीव घेणी ठरत आहेत. या टंचाईवर मात करण्यासाठी आचारसंहिता शिथील होताच ठाणेजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आदिवासी, दुर्गम भागातील गावखे्यांचा दौरा सुरू केला. त्यातील निरगुडापाडा व धारखिंड येथील गावाकऱ्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी तत्काळ दोन टँकर सुरू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागास जारी करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मुरबाड तालुक्यातील १८ गावे व ३८ पाडे या ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे टंचाईच्या गावांमध्येही वाढ होत आहे. या पाशर््वभूमीवर पवार यांनी दौरा करून ठिकठिकाणची पाणी समस्य जाणून घेतली. या दरम्यान निरगूडपाडा, धारखिंड येथील आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर सुरू करण्याचे आदेश त्यांनी त्वरीत जारी केले आहे. या गावातील ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी मजल दरमजल करून दूरवरून पाणी आणावे लागत होते. या परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करून तातडीची उपाययोजना म्हणून पवार यांनी दोन टँकरव्दारे पाणी पुरवठ्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. या गावकºयांना रस्त्याची देखील समस्या भेडसावत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यावर देखील यावेळी चर्चा होऊन रस्ता दुरूस्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.------------
निरगुडापाडा - धारखिंडच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर सोडण्याचे जि.प.उपाध्यक्षाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:14 PM
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून मुरबाड तालुक्यातील १८ गावे व ३८ पाडे या ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे टंचाईच्या गावांमध्येही वाढ
ठळक मुद्देया ५६ गावखेड्यांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठानिरगूडपाडा, धारखिंड येथील आदिवासी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी दोन टँकर