ठाणे : ठाणेकरांना येत्या काही महिन्यात जलवाहतुकीची सफर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसात पहिल्या टप्याच्या कामाला सुरुवात होणार असून या टप्यात वसई - मीरा भार्इंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत -दिवा- भिवंडी- कल्याण या मार्गांचा समावेश आहे. हे काम पाहून शासनाने ठामपावर जलवाहतुकीच्या टप्पा दोनचादेखील सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार पालिकेने या कामासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची तयारी केली आहे. यासाठीच्या निविदेला दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. परंतु, अद्यापही तिला योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. असे असले तरी डिसेंबर अखेर या दोन्ही टप्यांचा अहवाल केंद्राला सादर केला जाईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला.ठाणे महापालिका खाडीतून अंतर्गत जलवाहतुक सुरू करणार आहे. पहिल्या टप्यात वसई - मिराभार्इंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत- दिवा भिवंडी कल्याण हा २५ नॉटिकल मैल म्हणजेच ४५ किमी लाबींचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित केला आहे. यासाठी होणारा सुमारे ६५० कोटींचा निधी हा संपूर्णपणे केंद्राकडून मिळणार असल्याने पालिकेवरील खर्चाचा ताण कमी होणार आहे. जलवाहतुकीसाठी यशस्वी प्रयत्न केल्याने ठामपाला दुसºया टप्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सोपविले आहे. वास्तविक, हे दोन्ही मार्ग ठाण्यातूनच जाणार असल्याने पालिकेनेदेखील त्याची तयारी केली आहे. त्यानुसार आता दुसºया टप्यात ठाणे ते नवी मुंबई आणि तिसºया टप्यात ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया या मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. यामध्ये खाडीच्या पाण्याची गुणवत्ता, खोली, भरती, आहोटीचा कालावधी, पहिल्या टप्यातील १६ जेट्टींचा पुन्हा प्लेन टेबल सर्व्हे, डिझाईन, टेक्निकल बाबी, खाडीचा प्रवाह, बायोमेट्रीक सर्व्हे, टप्यातील अंतर या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर त्यासाठी येणाºया खर्चाचा अंदाज या माध्यमातून बांधला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार याचा अभ्यास करण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी ४.५० कोटींचा खर्च केला जाणार आहे.परंतु, यासाठी काढलेल्या निविदेला दोन वेळा मुदतवाढ दिली तरीदेखील तिला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु, असे असले तरी डिसेंबरअखेरपर्यंत केंद्राला सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला जाईल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.जलवाहतुकीच्या ठाणे - कल्याण -वसई या फेज १ ला केंद्राची तसेच राज्य शासनाची तत्त्वता मान्यता मिळाल्यानंतर आता फेज २ चा डीपीआर तयार करण्याचे काम ठाणे महापालिकेने केले. ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया आणि ठाणे ते पनवेल तसेच जेएनपीटीला जोडणारा हा फेज २ चा जलमार्ग आहे. हा प्रकल्प कितपत यशस्वी होऊ शकतो, याचा अहवाल तयार करून तो राज्य शासनाला २४ एप्रिल २०१८ रोजी सादर केल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची अनुमती राज्य शासनाकडून ठाणे महापालिकेला मिळाली आहे. दुसºया टप्प्यातील जलवाहतुकीमुळे २० टक्के रस्ते वाहतुकीचा भार हलका होणार असून सध्या घोडबंदरहुन मुंबईला जाण्यासाठी जे दोन तास लागतात तो प्रवास १ तासाने कमी होणार असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.असा असेल टप्पा दोनठाणे ते मुंबईचा जलमार्ग ठाणे (साकेत) पासून जलवाहतुकीला सुरु वात होणार असून त्यानंतर कळवा - विटावा - मीठबंदर - ऐरोली -वाशी - ट्रॉमबे - एलिफंटा -फेरी वार्फ - गेटवे आॅफ इंडिया. ठाणे नवी मुंबईचा मार्गदेखील साकेतपासून सुरु वात होणार आहे. त्यानंतर वाशी - नेरूळ -बेलापूर - तळोजा -तर एक मार्ग बेलापूर हा पनवेलला जोडण्यात येणार असून व्हाया जुईनगरला जाणार आहे. तर अजून एक मार्ग जेएनपीटी आाणि उरण मार्गे नेरूळला जाणार आहे.
निविदेला दुसऱ्यांदा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:19 AM