शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

ना मुबलक पाणी, ना अखंडित वीज, विकसित बदलापूरच्या नुसत्याच गप्पा

By पंकज पाटील | Published: August 24, 2024 5:38 AM

बदलापूरकरांनी आंदोलनातून राजकारण्यांना दाखवला आरसा

- पंकज पाटील

बदलापूर : बदलापूर शहर जसे झपाट्याने वाढले आणि त्यासोबत लोकसंख्याही वाढली. या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुबलक पाणी, अखंडित वीज या मूलभूत सुविधा देण्यात प्रशासनाला, राजकारण्यांना अपयश आले.  ‘आमचे बदलापूर, विकसित बदलापूर’, असा टेंभा मिरवणाऱ्या राजकारण्यांना बदलापूरकरांनी आंदोलनातून आरसा दाखवला. आपला संताप दाखवण्यात बदलापूरकर कमी पडले नाहीत.एकेकाळी ग्रामपंचायत असलेल्या बदलापूर आणि त्याच्या परिसराचा गाव एकत्रित करून नगरपालिका करण्यात आली.

त्यामुळे या नगरपालिकेचे नेतृत्व करणारे स्थानिक ग्रामस्थ राहिले. मात्र, आज शहर वाढत असताना, या वाढत्या शहराला मुबलक पाणी देण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना मिळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत १६० दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहरातील गळतीचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांच्या घरात असल्यामुळे पाणी असताना शहरवासीयांना पाणी देण्यात अपयश येते. 

सोसायट्या टँकरवर अवलंबूनशहरात नव्याने विकसित होणाऱ्या कात्रप, शिरगाव, मांजर्ली, वालीवली या भागांत पाणीपुरवठा नावाला आहे. त्यामुळे नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

वाढीव पाणी मंजुरी कागदावरचबदलापूरला पाच दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी एमआयडीसीकडे अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र, त्यातील केवळ दोन दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे अपुऱ्या पाणीपुरवठामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे.

हे तर लोड शेडिंगचे शहर...बदलापूरमध्ये विजेची समस्याही कायम आहे. अखंडित वीजपुरवठा करणे अपेक्षित असताना दीड लाखांहून अधिक शहरवासीयांना मुबलक वीजपुरवठा होत नाही. अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे बदलापूरचे नावही ‘लोड शेडिंगचे शहर’, असे झाले आहे. नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींना विजेची जोडणी देणे बंधनकारक असले, तरी वाढीव वीज उपलब्ध होत नसल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. यासोबतच वीजपुरवठा करणारी यंत्रणादेखील अपुरी असल्यामुळे विजेचा खेळखंडोबा कायम असतो.

शिरगाव भागात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावते. आम्हाला या ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावे लागते. काही भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असला, तरी तो नियमित येत नाही.- मनोज राजगुरू, बदलापूर.

दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार बदलापुरात सतत घडत असतो. पावसाळ्यात, तर वीजपुरवठा खंडित होण्याची गणनाच करू शकत नाही. त्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.- प्रदीप जाधव, बदलापूर.

टॅग्स :badlapurबदलापूर