ठाणे - भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये दुपारनंतर वेगवेगळ््या पक्ष-संघटनांचे कार्यकर्तेही उतरल्याने आंदोलनाला कोणी एक नेता, कोणताही एक गट किंवा पक्ष असे स्वरूप न येता ते अस्मितेचे आंदोलन बनले आणि सकाळपेक्षा दुपारनंतर ते अधिक आक्रमक, तीव्र, टोकदार बनले.रेल्वे, एसटी, परिवहन सेवा, रिक्षा-टॅक्सी एवढेच नव्हे तर ओला-उबेरसारख्या खाजगी वाहतुकीच्या सेवाही थंडावल्याने आंदोलनाचा प्रभाव, परिणाम वाढतच गेला. काही ठिकाणी दोन गटांत तणाव झाला, संघर्ष उडाला. त्यामुळे सायंकाळी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा झाल्यानंतरही काही भागात खदखद कायम होती.बंदमुळे ठाणे जिल्ह्यात रस्त्या-रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. मोजकीच दुकाने त्यात खास करून गरजेच्या वस्तुंची, औषधांची दुकाने काही काळ उघडी होती. सकाळच्या वेळेत ठिकठिकाणी आंदोलने झाली. पण त्यानंतरही दैनंदिन व्यवहार सुरू होते. त्यामुळे काही ठराविक पक्ष किंवा गटच बंदसम्राट असू शकतात, अशी मते मांडणारे मेसेज सोशल मीडियावरून फिरू लागले. सकाळच्या वेळेत पोलिसांनी ठराविक काळ आंदोलन केल्यावर आंदोलकांना पांगवले. त्यामुळे बंद होता, पण त्याची तीव्रता नव्हती. पोलीसही खूप सक्रिय होते. वेगवेगळ््या भागात आंदोलने होऊनही शहरे बंद पडत नसल्याने दुपारनंतर पक्षभेद विसरून रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, सिवसेना, मनसे, इतर संघटनांचे कार्यकर्तेही एकाच झेंड्याखाली आंदोलनात सहभागी झाले आणि आंदोलन अधिकाधिक तीव्र बनले. सकाळच्या वेळी आक्रमक असलेल्या पोलिसांनीही त्यामुळे बघ्याची भूमिका घेतल्याची टीका सुरू झाली. सर्वप्रथम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, नंतर दुकानांसह कार्यालये, बाजारपेठा बंद पाडण्यात आल्याने आंदोलनाची धग जाणवू लागली. वाहने न मिळाल्याने प्रदीर्घ अंतर चालत जाणारे प्रवासी, नागरिकांचे जत्थे सर्वत्र दिसू लागले आणि आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली.1,124एसटीच्या फेºया रद्दआंदोलनकर्त्यांनी एसटी बसला लक्ष्य केल्यानंतर सकाळी बससेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत जिल्ह्यातील एसटीच्या एसटीच्या एक हजार १२४ फेºया रद्द करण्यात आल्या. यात ठाणे एक आणि दोन येथील ३४१, कल्याणमधील १७४, विठ्ठलवाडी डेपोच्या १३२, शहापूर १६५, वाडा ५४, भिवंडी ११८ आणि मुरबाडच्या १४० फेºया रद्द करण्यात आल्या. दुपारी चारनंतर एसटीसेवा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. फेºया रद्द केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल झाले.पुतळ्यांचे दहनघोडबंदर रोडवरील बह्मांडनाका तब्बल चार तास आंदोलनकर्त्यांनी रोखून धरला. शांततेत सुरु झालेल्या आंदोलनाने दुपारनंतर अचानक हिंसक वळण घेतले. ठाण्यात दोन वेळा, कळव्यात काही काळ, नंतर दिवा स्थानकात आंदोलनकर्त्यांनी रेल रोको केला. घाटकोपर ते कल्याणदरम्यान रेल्वेसेवा बंद झाल्याने दुपारी ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.यावेळी ठाण्यातून काही विशेष लोकल डोंबिवली-कर्जतच्या दिशेने सोडण्यात आल्या. दिव्यात रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केल्याने मुंबईकडे जाणारी जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतुक रोखून धरण्यात आली. ली होती. एक्सप्रेसही रोखण्याचा प्रयत्न केला. आरपीएफने आंदोलनकर्त्यांची समजूत काढून सेवा सुरू केली.सात एसटी, सहा टीएमटी बससह काही खाजगी वाहनांची तोडफोड झाली. काही वाहनांची हवा काढण्यात आली. लोकमान्यनगर परिसरात आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले.ठाणे महापालिका मुख्यालयही बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. मुंबईत आंदोलक आक्रमक झाल्यानंतर दुपारपर्यंत २० ठाणे लोकल रद्द करण्यात आल्या.मुख्य बाजारपेठ बंदठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेसह शहरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. मेडिकल सोडून इतर दुकाने पूर्ण बंद करण्यात आल्याने पदपथही मोकळे होते.ठाण्यात ठिकठिकाणी रास्ता रोकोठाणे शहरात तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅबडरी, कळवा परिसर, पातलीपाडा आणि ब्रह्मांड नाका येथील मुख्य मार्ग रोखून धरण्यात आले होते. ब्रह्मांड नाक्यावरील मुख्य रस्त्यासह सर्व्हिस रोड मोठे पाईप टाकून चार तास रोखून धरले होते.गटागटाने आंदोलनकर्ते रस्त्यावरएकीकडे जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश दिले असताना, ठाण्यासह अन्य ठिकाणी आंदोलनकर्ते जमावान, गटागटाने फिरत होते. दुचाकी घेऊन आंदोलनकर्ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्याने जातांना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही सुरू होती.‘‘ठाणे ग्रामीण भागात कोठेही दगडफेक किंवा तोडफोड झालेली नाही. मात्र, जमाव मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर उतरल्याने रात्री उशिरापर्यंत जमावबंदीप्रकरणी गुन्हे दाखल होतील. तसेच बंद लक्षात घेऊन १५० पोलीस अधिकारी आणि एक हजार पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटा तैनात केला गेला होता.’’- महेश पाटील, अधीक्षक, ठाणे ग्रामीण पोलीसबंद लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. यात एसआरपीएफ चार, तर आरसीपीच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे. या बंददरम्यान जमावबंदीचे उल्लंघन आणि रस्ता रोको तसेच वाहनांच्या तोडफोडीप्रकरणी रात्री उशिरापर्यंत त्या-त्या स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.- सुनील भारद्वाज, उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीसटीएमटीचे १५ लाखांचे नुकसानमंगळवार-बुधवारी ठाणे महापालिकेच्या १० बसेस फोडण्यात आल्या. बुधवारी बस फोडताच ही सेवा बंद करण्यात आली. बस फोडल्याप्रकरणी टीएमटी प्रशासनाने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. या घटना शिवाईनगर, ठाणा कॉलेज आणि आॅटोमॅटिक कंपनी परिसरात घडल्या. यात टीएमटीचे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.सॅटीस, स्टेशनपरिसरात शुकशुकाटठाणे स्टेशन परिसरातील एसटी स्थानक व सॅटीस सततचा वर्दळीचा परिसर. मात्र, बंदमुळे या भागात शुकशुकाट होता. पुलावर एक टीएमटीची बस नव्हती. पुलाखाली रिक्षा नसल्याने ठाणेकरांचे प्रचंड हाल झाले. वाहने नसल्याने वयोवृद्धांची चांगलीच पायपीट झाली.
ना गट ना नेता, आंदोलनात फक्त अस्मिता! शांततेतील आंदोलन दुपारनंतर आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 6:27 AM