ठाणे : दरवर्षी दहीहंडी उत्सवाच्या दिवशी होणारे ध्वनिप्रदूषणच्या तुलनेत मंगळवारी या उत्सवाच्या दिवशी ध्वनीप्रदूषण आढळून आले नाही. उलट २० ते ३० डेसीबलचा फरक जाणवला असल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदविले. उत्सवाच्या दिवशी कुठेही वाहतूक कोंडी नाही, रस्ते अडवले नसल्याचे तसेच लाऊड स्पिकर नसल्याचे दिसून आले, असे ते म्हणाले.
डॉ. बेडेकर यांनी नोंदविलेले निरीक्षण खालीलप्रमाणे
ठिकाण। वेळ। डेसीबल
भगवती शाळा : १.३०। ७० - ७५
तलावपाळी। १.४०। ८०- ८५
जांभळी नाका १.४२। ८०- ८५
वर्तक नगर। २ ७०
समता नगर। २.१०। ८०
वरील आवाज हा सभोवतालचा रहदारीचा, वाहतुकीचा असल्याचे मत बेडेकर यांनी आपल्या निरीक्षणात नोंदविले.