शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

पदभार न स्वीकारणारे आता होणार निलंबित

By admin | Published: May 04, 2017 5:33 AM

पालघर जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी महत्वपूर्ण असणार्या रोहयो अंतर्गत रोजगार निर्मितीसाठी नेमलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांची

पालघर : पालघर जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी महत्वपूर्ण असणार्या रोहयो अंतर्गत रोजगार निर्मितीसाठी नेमलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही त्यांनी आपला पदभार न संभाळल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांनी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्र मगड, वाडा इ. भागात रोजगार उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असे. त्याचा विपरीत परिणाम कुपोषण, शिक्षण व आरोग्यावर होत असल्याने हे स्थलांतर रोखण्यासाठी गावागावात रोजगाराची निर्मिती करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले होते. मात्र कमी मजूरी ती ही वेळेवर दिली जात नाही. बोगस मजूर दाखवून पैसे लाटणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होता. ते रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात रोजगार हमी योजना विभागासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र आदेश देऊनही पदभार स्वीकारण्यास ते तयार होत नसल्याने त्याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील रोहयो अंतर्गत कामावर पडला होता. विवेक पंडितांनी ह्या बाबत प्रधान सचिवांच्या लक्ष वेधल्यानंतर नियुक्ती होऊनही हजर न राहणार्या अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश परदेशी ह्यांनी दिले. तसेच आरोग्य विभागांतर्गत एमबीबीएस, बीएएमएसच्या रिक्त जागा भरण्याबाबत रोस्टर पद्धतीचा विचार न करता व जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे त्या तात्काळ भरण्याचे आदेश पालघरच्या मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांना दिले. जव्हार येथे ३०० खाटांचे हॉस्पिटल तयार करून तिथे मेडिकल कॉलेज बनविण्याच्या श्रमजीवीच्या मागणी वरून तात्काळ प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वैद्यकीय विभागाच्या सचिवांना यावेळी देण्यात आले. जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासह, महानगर पालिका, नगरपालिका अंतर्गत काम करणार्या कंत्राटी कामगारांचे चाललेले शोषण रोखण्यासाठी व कामगारांना किमान वेतन देण्याबाबत 70 प्रकारच्या आस्थापना(विभाग)मध्ये काम करणार्या सर्व कामगारांना एकच किमान वेतन निर्धारित करण्याबाबतची सूचना विवेक पंडितांनी मांडली असता या बाबत राज्याचे कामगार आयुक्त केसुरे यांना तातडीने आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश प्रधान सचिव परदेशी ह्यांनी दिल्याची माहिती ह्या चर्चे दरम्यान उपस्थित असलेले श्रमजीवी संघटनेचे संपर्क प्रमुख प्रमोद पवार ह्यांनी दिली. (वार्ताहर)रेशनमध्ये होणार वाढपालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासींना अंत्योदय योजनेचा लाभ देऊन रेशनवर डाळ व गोडेतेल देण्याबाबतचा पायलट प्रोजेक्ट पालघर जिल्ह्यात तात्काळ राबविण्या संदर्भातला प्रस्ताव तात्काळ नागरी व अन्न पुरवठा विभागाकडे पाठविण्याचे आदेश जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी यांना यावेळी देण्यात आल्याने ग्रामीण भागातील गरिबांना मिळणाऱ्या अपुऱ्या रेशनमध्ये वाढ होईल.