ठाणे: कल्याणमध्ये उध्दव सेनेला आपला पराभव दिसत आहे. त्यात त्यांनाच त्यांच्या उमेदवारावर विश्वास नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आणखी एक उमेदवार उभा केला आहे. त्यांनी दोन काय किंवा आणखी १० उमेदवार उभे केले तरी देखील कल्याण मधून डॉ. श्रीकांत शिंदे हेच निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले संजय निरुपम यांनी आनंद आश्रम येथे शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या पदाधिकाऱ्यांसह शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला.
महायुतीचे सहा उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतांना काही ठिकाणी समीकरणे बदल्याने उमेदवार बदलावे लागले. त्यातही जो पर्यत अधिकृत उमेदवार जाहीर होत नाही, तो पर्यंत प्रत्येकाला उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा असेत, त्यात वावगे असे काहीच नाही. मात्र एकदा उमेदवार निश्चित झाला की सर्व एकदिलाने काम करतात ही पक्षाची शिस्त असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईतील कोळीवाड्यांच्या ठिकाणी आता फुड स्टॉल सुरु करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
कोस्टल रोडमुळे कोळी बाधवांना अडचण निर्माण होणार होती. त्यानुसार त्यांनी मागणी देखील केली होती. परंतु आधीच्या सरकारने कोस्टलरोड मध्ये काहीही बदल करता येत नसल्याचे सांगितले. मात्र आपले सरकार आल्यानंतर आपण येथील कोस्टल रोड ६० मीटरवरुन १२० मीटर केला. त्यामुळे कोळी बांधवांची अडचण देखील दूर झाली असून एकनाथ शिंदे याच्या डायरीत नाही हा शब्द नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. खरी शिवसेना, धणुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार हे आमच्याकडे आहेत. त्यामुळे स्वांतत्रवीर सावरकरांचे नाव देखील घेण्याचे अधिकार उध्दव ठाकरे यांना नसल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी हे वारंवार मतदार संघ बदलत असून ज्यांना स्वत:च्या विजयाची खात्री नाही ते देशाची गॅरीन्टी काय देणार अशी टिकाही त्यांनी केली.
दरम्यान संजय निरपुम यांना लोकसभा लढवायची होती. त्यांनी माझ्याबरोबर चर्चा देखील केली होती. परंतु त्यांना उमेदवार निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. तसेच पक्षासाठी आपण काम करावे असेही सांगण्यात आले. त्यांनी तशी तयारी देखील दर्शविली आणि आता प्रवक्ते तसेच समन्वयक म्हणून काम पाहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षात येतांना त्यांनी कोणताही अपेक्षा न ठेवता प्रवेश केला असून हा यासाठी मी त्यांचे कौतुक करतो असेही त्यांनी सांगितले.
२० वर्षानंतर स्वगृही परतलो - संजय निरपुम
२० वर्षानंतर मी आज आपल्या पत्नी आणि इतर पदाधिकाºयांसमवेत स्वगृही परतलो असल्याची प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी व्यक्त केली. कॉंग्रेसमध्ये असतांनाही बाळासाहेबांच्या विचारानुसारच काम करीत होतो असेही त्यांनी सांगितले. कॉंग्रेसमध्ये दगाबाजी झाली, मला लोकसभा लढवायची होती. मात्र आता शिंदे यांचे हात मजबुत करायचे असल्याने त्यांच्यासाठी काम करेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.