शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

"नको ऑनलाइन शाळा; द्या पाटी, पेन्सिल आणि फळा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:33 AM

मुरबाड पंचायत समितीत ठिय्या; आदिवासी विद्यार्थ्यांकडून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; असुविधांकडे वेधले शासनाचे लक्ष

मुरबाड: लॉकडाऊनमुळे शाळा बंद ठेवून शासनाने आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, मोबाइल, विजेची समस्या असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या आॅनलाइन शिक्षणाचा निषेध करण्यासाठी रविवारी जागतिक आदिवासीदिनी श्रमजीवी संघटनेतर्फे मुरबाड पंचायत समितीत ठिय्या आंदोलन केले. ‘आम्हाला नको आॅनलाइन शाळा. फक्त द्या पाटी, पेन्सिल आणि वर्गातील फळा’ अशी मागणी करत गटविकास अधिकारी रमेश अवचार व सभापती श्रीकांत धुमाळ यांना निवेदन दिले. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे दिनेश जाधव, दशरथ भालके, चिंतामण भागरथ, हिराबाई खोडका, महेश वाघ यांच्यासह अनेक आदिवासी बांधव सहभागी झाले होते.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आॅनलाइन पद्धतीने शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, ज्या पालकांकडे उच्च प्रतीचा मोबाइल आहे, त्यांच्या मुलांनाच आॅनलाइन शिक्षण मिळते. ग्रामीण भागात आणि अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाºया ८० टक्के पालकांकडे मोबाइल नसतो. असलाच तर तो साधा. त्याला चार्जिंग करण्यासाठीही काही वाड्यावस्त्यांवर लाइटची सुविधा नसते. त्यामुळे शासनाने सुरू केलेल्या आॅनलाइन शिक्षणाचा फक्त श्रीमंतांच्या मुलांना फायदा होत आहे. मग, आम्ही काय करायचे, असा सवाल आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आहे. सभापती धुमाळ म्हणाले की, जागतिक आदिवासी दिनाच्या उत्साहावर कोरोनाने संक्र ांत आणली असली, तरी आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी सर्व सभासदांना एकत्र करून या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी साकडे घालीन, असे आश्वासन दिले. दरम्यान, आंदोलनादरम्यान सविता मुकणे ही बारावीची विद्यार्थिनी चक्कर येऊ न पडली. यात ती जखमी झाली.शाळा सुरू करा; अन्यथा सुविधा पुरवा!कोरोनाचा प्रादुर्भाव हा शहरी भागांत अधिक आहे. आम्ही आदिवासी शहरांपासून कोसो मैल दूर आहोत. जगभरात कोरोनाने थैमान घातले असले, तरी त्याची बाधा एकाही आदिवासीला झालेली नाही. त्यामुळे शासनाने एकतर आमच्या वाड्यापाड्यांमध्ये शाळा सुरू कराव्यात. त्यासाठी शाळेवर कार्यरत असणाºया शिक्षकांना स्थानिक ठिकाणी वास्तव्य करण्याची सक्ती करावी किंवा आमच्या विद्यार्थ्यांना मोफत मोबाइल द्यावे. तसेच तो वापरण्यासाठी दरमहा रिचार्ज टाकण्यासाठी रोख अनुदान द्यावे. विशेष म्हणजे ते मोबाइल २४ तास सुरू ठेवण्यासाठी सुरळीत वीजपुरवठा करावा. शासनाने या सुविधा तातडीने पुरवाव्यात, अशी मागणी आदिवासी विद्यार्थ्यांनी केली.भिवंडीतही मोर्चाभिवंडी : आवश्यक सोयीसुविधा नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहत असून सरकारने त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी श्रमजीवीने पंचायत समितीवरही मोर्चा काढला होता. शालेय विद्यार्थ्यांनी गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांना निवेदन दिले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुरेखा भोईर, दत्तात्रेय कोलेकर, बाळाराम भाईर आदी उपस्थित होते.