भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण मंडळाला विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई मंडळाने अतिरिक्त पदभार असलेल्या अर्धवेळ शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. येथील शिक्षण मंडळाचे हे अर्धवेळ कर्तव्य बजावण्यासाठी कोणताही अधिकारी तयार होत नसल्याने पूर्णवेळ अधिकाºयांचीच त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी पालिकेच्या शिक्षण मंडळ सभापती ज्योत्स्ना हसनाळे यांनी पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे केली आहे.
या पदावर नियुक्ती करुनही संबंधित अधिकारी अद्याप हजर झालेले नाही. त्यामुळे पालिकेचे शिक्षण मंडळ अनेक दिवसांपासून शिक्षणाधिकाºयांच्या प्रतीक्षेत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १२ जानेवारीला प्रसिद्ध केले होते. त्या अनुषंगाने शिक्षण सभापतींनी आयुक्तांसोबत चर्चा करुन पूर्णवेळ शिक्षणाधिकाºयांच्या त्वरित नियुुक्तीची मागणी केली आहे.
या पदावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रथमच भास्कर बाबर या वर्ग १ च्या अधिकाºयाची तीन वर्षांपूर्वी नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांची १७ डिसेंबर २०१८ मध्ये बदली झाली. त्यांच्या जागी चेंबूर येथील निरंतर शिक्षण कार्यालयात कार्यरत असलेले कार्यक्रम सहायक रामचंद्र शिंगाडे यांची दहा दिवसानंतर नियुक्ती केली. मात्र त्यांच्याकडे मीरा-भार्इंदर शिक्षण मंडळाचा पूर्णवेळ नव्हे तर अतिरीक्त कार्यभार सोपविल्याने चेंबूर येथून पुन्हा मीरा-भार्इंदर शिक्षण मंडळाचा कारभार सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करण्यासारखे ठरणार असल्याने त्यांनी अद्याप येथील अर्धवेळ कार्यभार स्वीकारला नसल्याचे सांगण्यात आले. या अर्धवेळ कार्यभाराला शिक्षण विभागातील इतर अधिकाºयांनीही हात जोडल्याने शिंगाडे यांच्यावर जबाबदारी टाकल्याचे बोलले जात आहे.
शहरात पालिका शाळांसह एकूण ३७५ शाळा आहेत. त्यांना भेटी देणे, त्यातील शिक्षणांसह सोईसुविधांचे सर्वेक्षण करणे, त्याचा आढावा घेऊन अहवाल तयार करणे, या कामांसह विभागातंर्गत कामांचा निपटारा करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाºयांच्या नियंत्रणाखाली पार पाडणे सुलभ होत असल्याने त्यासाठी पूर्णवेळ अधिकारी असावा, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे. सध्या विभागातील कर्मचाºयांनाच दैनंदिन कामे हातावेगळी करावी लागत आहे. विभागप्रमुखाअभावी अनेक महत्वाची कामे प्रलंबित राहत असल्याने कामांचा तात्पुरता निपटारा होण्यासाठी आयुक्तांनी समाजविकास अधिकारी दिपाली पोवार यांच्याकडे अतिरीक्त कार्यभार सोपविला आहे. त्यामुळे मुख्यालयापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या शिक्षण मंडळातील कर्मचाºयांना कामासाठी मुख्यालयाची सतत पायपीट करावी लागत आहे.
पालिका हद्दीतील खाजगी शाळांसह पालिकेच्या ३६ शाळांचा कारभाराचा व्याप वाढला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अर्धवेळ शिक्षणाधिकाºयाची नियुुक्ती अयोग्य ठरणार आहे. त्यामुळे पूर्णवेळ शिक्षणाधिकाºयाचीच त्वरित नियुक्ती व्हावी, अशी मागणी केली आहे.- ज्योत्स्ना हसनाळे, सभापती