शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

मालमत्तांची भाडेवसुलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 3:14 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ताब्यातील मालमत्ता उत्पन्नवाढीसाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ताब्यातील मालमत्ता उत्पन्नवाढीसाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. महापालिकेने भाडेकरूंकडून थकीत भाडे वसूल केलेले नाही. तसेच त्यांचे भाडे नव्याने ठरवलेले नाही. विलंब शुल्कही वसूल केला नाही. भाडे न भरणाऱ्यांविरोधात कारवाई करून त्यांच्या ताब्यातून मालमत्ताही जप्त केलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेस नुकसान सहन करावे लागत आहे, ही बाब महापालिकेच्या लेखापरीक्षण अहवालात उघड झाली आहे.महापालिकेने विविध मालमत्ता भाडेतत्त्वावर दिलेल्या आहे. या मालमत्तांकडून महापालिकेने नियमित भाडेवसुली केली पाहिजे. त्यांचे भाडे ठरवले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांत महापालिकेने त्यांचे भाडेच निश्चित केलेले नाही. जुन्याच भाडेदराने वसुली सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. त्यातच भाडेकरूंनी मालमत्तांचे भाडे थकवले आहे. मात्र, त्यांच्याविरोधात महापालिकेने कोणतीच कारवाई केलेली नाही. याउलट, भाडेकरू महापालिकेच्या मालमत्तेवर पैसा कमावत आहेत. याबाबत, २०१४-१५ च्या लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहे. त्याविषयीचे तपशील मागूनही संबंधित विभागाने तपशील व मालमत्तांची यादीच दिलेली नाही.महापालिकेचा बेकायदा बांधकामविरोधी कारवाई विभाग हा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. महापालिकेने बेकायदा बांधकामे तोडण्याच्या कारवाईवर १० लाख रुपये खर्च केले होते. तसेच पोलीस बंदोबस्त व भत्ते या कामावर ७० लाख रुपये खर्च झाला होता.बेकायदा बांधकामे तोडण्याची नोटीस संबंधित बेकायदा बांधकामधारकास दिली जाते. त्यात बेकायदा बांधकाम स्वत: तोडून घ्यावे, अन्यथा महापालिका कारवाई करेल. त्यासाठी येणारा खर्च आपल्याकडून वसूल केला जाईल, असे स्पष्टपणे नमूद केले जाते. मात्र, बांधकाम तोडण्यासाठी केलेला एकूण ८० लाख रुपयांचा खर्च संबंधित बेकायदा बांधकामधारकांकडून वसूलच केलेला नाही. त्यामुळे ८० लाखांचा खर्च भरून न निघाल्याने महापालिकेचे नुकसान झाले आहे.नगरविकास विभागाकडून बांधकाम परवानगी दिली जाते. विकास शुल्क आकारले जाते. त्यापोटी महापालिकेच्या तिजोरीत ६५ कोटी रुपये जमा होणे अपेक्षित होते. त्यापैकी केवळ ५७ कोटी रुपये जमा झाले आहे. महापालिकेच्या तिजोरीत आठ कोटींची रक्कम कमी जमा झालेली आहे.महिला बालकल्याण समितीकरिता जेंडर बजेट म्हणून पाच कोटी ७२ लाख रुपयांची तरतूद होती. त्यापैकी केवळ दोन कोटी ४४ लाख रुपये खर्च झाले आहे. ४२ टक्केच निधीचा वापर झालेला आहे. उर्वरित रक्कम खर्चली गेली नाही. अपेक्षित योजनांसाठी रक्कम खर्च होणे गरजेचे होते.>तरतूद असतानाही निधी पडूनदुर्बल व मागासवर्गीय घटकांच्या विकासासाठी १४ कोटी ९३ लाख रुपये तरतूद होती. त्यापैकी केवळ आठ कोटी १४ लाख रुपये खर्च झाले आहेत. निधीचा पुरेपूर वापरच केला जात नसल्याची बाब लेखापरीक्षणातून उघड झाली आहे.शहरी गरिबांसाठी सोयीसुविधांसाठी १०० कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी केवळ ६३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यावरून दुर्बल घटक, शहरी गरीब, मागासवर्गीय यांच्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदीनुसार त्यांच्याकरिता असलेल्या योजनांच्या कामी पैसा पुरेपूर खर्च केला जात नाही. ही बाब उघड झाली आहे.कोणत्या घटकांसाठी अर्थसंकल्पाचा एकूण खर्च व उत्पनाच्या किती टक्के रक्कम खर्च केली पाहिजे. याचे निकष राज्य सरकारने ठरवून दिले आहेत. मात्र, त्यानुसार केवळ तरतूद दिसून येते. खर्च केला जात नाही, हे उघड झाले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका