लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट, अमली पदार्थांचे सेवन व त्यांचे दुष्परिणाम, आदींमुळे माणसाला शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागत आहे. त्याविरोधी गुरुवारी ''धूम्रपान निषेध दिवस''निमित्त ऑनलाईन वेबिनार येथील बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात पार पडले.
या कार्यक्रमास सलाम मुंबई फाउंडेशनचे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पोस्टर, व्हिडिओ, चित्रफितीद्वारे धूम्रपानाबद्दल जनजागृती करून व्यसनमुक्तीचे आवाहन केले. याप्रसंगी बांदोडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोझेस कोलेट, उपप्राचार्य डॉ. डी. आर. आंबावडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक डॉ. उज्ज्वला गोखे, कार्यक्रम अधिकारी प्रा. आकांक्षा शिंदे, डॉ. प्रल्हाद वाघ, राष्ट्र छात्र सेना समन्वयक कॅ. बिपीन धुमाळे, युवा जागरचे समन्वयक प्रा. अनिल आठवले, आय. टी. विभाग प्रमुख अभिजित काळे, प्रा. सुधीर भोसले व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सहभागी झाले. डॉ. प्रल्हाद वाघ, आदी उपस्थित होते.