लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : महापालिका निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचा रविवार उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींसाठी कारणी लावल्याने दिवसभर रस्ते गर्दीने फुलून गेले होते. उन्हाचा कडाका असूनही घामाघून होत उमेदवार आणि कार्यकर्ते गल्लीबोळ पिंजून काढत होते. दिवसभरातील पदयात्रा, चौकसभा आणि प्रचारफेऱ्यांमुळे शहर गजबजून गेले होते. पालिका निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी संपणार असल्याने हा एकच दिवस उमेदवारांच्या हाती होता. गुरूवारच्या जुम्मे रातपासून भिवंडीतील प्रचारात जान आली. शुक्रवार हा कामगारांच्या सुटीचा दिवस असल्याने त्या दिवशी आणि शनिवारी मोठ्या जाहीर सभा झाल्या, पण रविवारी मात्र उमेदवार, कार्यकर्ते गल्लीबोळ पिंजून काढताना पाहायला मिळाले. शनिवारीही ठिकठिकाणी चौकसभा होत होत्या. प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका असेच त्याचे स्वरूप होते. पण रविवारी मात्र आणखी एकदा मतदारांच्या गाठीभेटी घेत, त्यांचे प्रश्न जाणून घेत उमेदवारांनी सर्व प्रश्न, समस्या सोडवण्याचा वायदा केला.प्रचारातील शेवटचा रविवार असल्याने नोकरदार, व्यापारी, कामगार, वेगवेगळ््या निवासी संकुलातील महिला आणि तरूण मतदारांच्या भेटींवर सर्वांचा भर होता. अनेक निवासी संकूलांत खाजगी मिटींगही झाल्या. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, कोणार्क विकास आघाडी, भिवंडी डव्हलपमेंट फ्रंट यांच्यासह अपक्षांनाही गेले दोन दिवस प्रचारयात्रांचा धडाका लावला आहे. रविवारी पनवेलमध्ये प्रचारासाठी बहुसंख्य नेते उतरल्याने त्या दृष्टीने प्रचाराच्या आघाडीवर शांतता होता. स्टार प्रचारकही नव्हते. पण मजूर आणि कामगारा वर्ग असलेल्या गायत्रीनगर व शांतीनगर झोपडपट्टीत काँग्रेस, समाजवादी- राष्ट्रवादीच्या पॅनलच्या चारही उमेदवारांनी एकत्रित प्रचारफेरी काढली. अंजूरफाटा झोपडपट्टी, पद्मानगर व कामतघर झोपडपट्टी भागातही शिवसेना- भाजपाच्या उमेदवारांनी प्रचारफेरी काढली. भर दुपारच्या उन्हातही प्रचारफेऱ्या सुरू होत्या. पण मतदारच भेटेनेसा झाल्याने त्या काळात वैयक्तिक गाठीभेटींवर भर दण्यात आला आणि दुपारी चारनंतर पुन्हा प्रचाराने जोर पकडला. प्रचारासाठी कामगार मिळवतानाही उमेदवारांची दमछाक झाली. मग झोपड्यांकडे मोर्चा वळवण्यात आला. काहींनी तर अल्पवयीन मुलांनाही प्रचारात सहभागी करून घतेल. मागणी भरपूर असल्याने त्यांचाही दर वधारला. बहुतांश पुरूष कारखान्यात कामावर जात असल्याने रॅली व सभेत महिलांची संख्या भरपूर होती. यात कोंडी झाली, ती अपक्ष उमेदवारांची. आधीच कार्यकर्त्यांचे बळ कमी. त्यात प्रचारासाठी कामगार मिळेत नसल्याने ते दुहेरी अडचणीत सापडले. मुस्लिम महिलांची कमतरतामुस्लिम भागातील प्रचारात महिला उमेदवाराच्या प्रचारासाठीही महिला बाहेर पडत नसल्याचे दरवेळचे चित्र आताही कायम होते. त्यामुळे पत्नी, मुलगी किंवा कुटुंबातील महिलेचा प्रचार करण्यासाठी घरातील पुरूष मंडळीच फिरताना दिसत होती. गच्चीवर रंगल्या पार्ट्याउमेदवारांच्या नावाने शुक्रवारपासूनच रोख रकमा वाटण्यास सुरूवात झाल्याची चर्चा होती. त्यामुळे गच्चीवरी पार्ट्या रंगू लागल्या. घरगुती-हॉटेलांतील जेवण आणि सोबत दारू यांच्या पार्ट्या उशिरापर्यंत रंगत होत्या.सायकलवरून प्रचार चार वॉर्डांचा एक प्रबाग झाल्याने प्रचारासाठी आठ दिवसांचा अवधी उमेदवारांना अपुरा पडला. त्यामुळे काही उमेदवारांनी तीनचाकी सायकलवरून प्रचार केला. त्यातून उमेदवाराचे नाव आणि चिन्ह पोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
रविवार नव्हे, प्रचारवार!
By admin | Published: May 22, 2017 2:00 AM