शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

टीएमटी बसची भाडेवाढ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 1:26 AM

२०२०-२१ अर्थसंकल्प ४३८ कोटी ८६ लाखांचा : प्रशासनाकडून परिवहन समितीला सादर

ठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिवहनच्या तिकीटदरात वाढ आवश्यक असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही मंगळवारी सादर केलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात मात्र प्रशासनाने कोणतीही भाडेवाढ सुचविलेली नाही. मंगळवारी २०२०-२०२१ चा ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन प्रशासनाने परिवहन समितीला सादर केला. गतवर्षी वर्षी ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदा मात्र तो ३७ कोटींनी कमी झाला आहे . विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेकडून ३५० कोटी अनुदानाची मागणी करणाऱ्या परिवहन प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात ६० कोटी कमी करून २९१ कोटींचीच मागणी केली आहे. बसची संख्या आणि प्रवाशांची संख्या वाढवण्यावर या अर्थसंकल्पात भर दिला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून परिवहनच्या तिकीटदरात वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून तांत्रिक कारणांमुळे प्रशासनाला ही दरवाढ करणे शक्य झालेले नाही. मात्र, २० फेब्रुवारी रोजी होणाºया महासभेत तिकीटदरवाढीचा प्रस्ताव आणला असल्याने परिवहनच्या अर्थसंकल्पातदेखील ती करण्यात येईल, असे अपेक्षित होते. परंतु, दरवाढीला आधीच विरोध झाल्याने अर्थसंकल्पात ती केलेली नाही.परिवहनच्या बहुतांश बसचे आयुर्मान संपले असल्याने त्या बदली करण्याची आवश्यकता आहे . मोठ्याप्रमाणात बस बंद करणे शक्य नसल्याने आधी त्यांची संख्या वाढविण्याचे नियोजन या अर्थसंकल्पात केले आहे . त्यानंतर टप्प्याटप्याने आयुर्मान संपलेल्या बस बंद करणार आहेत. पालिकेच्या २७७ पैकी केवळ सरासरी ११० बस रस्त्यावर धावत आहेत. १९० बस या जीसीसी तत्वावर आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नादुरु स्त असलेल्या १६० पैकी सीएनजीच्या १०३ बस एएमसी तत्वावर दुरु स्त करून त्या चालविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तर उर्वरित ६० बस भंगारात दिल्या जाणार आहेत.महिलांसाठी ५० तेजस्विनी पैकी ३० बसेस दाखल झाल्या असून २० बसेस मार्चपर्यंत दाखल होतील. तर जूनपर्यंत ५० मिडी बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ५० मिडी बसेसची मागणी असली तरी त्याऐवजी १०० मिनी बस खरेदी केल्या जाणार आहेत. ४०० ते ४५० बस दैनंदिन संचलनासाठी उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.ठामपाकडून मिळणाºया अनुदानात केली कपातगेल्या वर्षी ठाणे महापालिकेकडे परिवहन प्रशासनाने तब्बल ३५० कोटींच्या अनुदानाची मागणी केली होती. त्यातील १३० कोटींचे अनुदान देऊन ठामपाने परिवहनच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७ कोटींनी घट करून ३५० कोटींऐवजी २९१.४ कोटींची मागणी केली आहे. यापूर्वी प्रत्येक बसचा प्रत्येक किमी मागे १११ रुपये खर्च येत होता. तो आता केवळ ९८ रुपयांवर आणला आहे. प्रत्येक बसची क्षमता वाढविल्याने फेºयाही वाढवून प्रवाशांना वेळेत सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी यावेळी स्पष्ट केले.निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा टीएमटीवर १४.२४ कोटींचा भारआगामी आर्थिक वर्षात ठाणे परिवहन सेवेचे १०० कर्मचारी हे सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे आधीच सेवानिवृत्त झालेल्या ५२८ आणि चालू वर्षातील १०० असे ६२८ कर्मचाºयांच्या निवृत्ती वेतनाचा भार परिवहन प्रशासनावर येणार आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये १४ कोटी २४ लाखांची तरतूद केली आहे. इंधनासाठी या अर्थसंकल्पात एकूण ३७ कोटी तीन लाखांची तरतूद केली आहे. परिवहन सेवेतील कर्मचाºयांची नोव्हेंबर २०१९ पर्यंतची थकीत रक्कम ही ३० कोटी ७६ लाखांवर आहे. ती देण्यासाठी ठाणे महापालिकेकडे परिवहन प्रशासनाने ३० कोटी ३८ लाखांच्या अनुदानाची मागणी केली आहे .सॅटिसवर विशेष चौकशी कक्ष : रेल्वेस्थानकानजिकच्या सॅटिसपासून ६० मार्गावर परिवहनकडून प्रवाशांसाठी सेवा पुरविली जाते. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी या ठिकाणी एक चौकशी कक्ष स्थापन्यात येणार आहे. त्यात प्रशिक्षित कर्मचारी वर्ग परिवहनच्या प्रवाशांना कोणती बस कधी आणि कोणत्या मार्गावर येणार आहे, अशी सर्व माहिती देतील. अनेकवेळा योग्य माहिती न मिळाल्याने प्रवाशी अन्य पर्यायांचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी हा कक्ष स्थापन्यात येणार आहे. 

टॅग्स :Bus Driverबसचालकthaneठाणे