शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेमधून शहराला टप्प्याटप्प्याने पाणी देण्याचे नियोजन केले आहे. यानुसार शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कम्पाउंड, पवारनगर तसेच आझादनगर या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार संध्याकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्राचा काही भाग याठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
शुक्रवारी नाही ठाण्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:43 AM