मीरा रोड / भार्इंदर : दिवाळीत रात्री ८ ते १० दरम्यान फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वेळ तसेच राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटाके फोडू नका’, ‘प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा’, असे आवाहन केले असताना मीरा - भार्इंदरमध्ये मात्र, दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे.फटाक्यांमुळे आवाज तसेच फटाक्यांच्या धुराचा विविध प्रकारे होणारा त्रास पाहता बहुसंख्य नागरिकांमध्येही फटाके फोडण्यावरूननाराजी आहे. रु ग्ण, लहान मुले, वृद्ध यांना तर फटाके जाचकच ठरले आहेत. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्यास अटीशर्तींनुसार मंजुरी दिली आहे. तर दुसरीकडे स्वत: मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांसह शासनाने देखील फटाके फोडू नका असे आवाहन करत प्रदूषणमुक्त दिवाळीचे धोरण अवलंबले आहे.मात्र, मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असूनही महापालिकेने शासनाचे धोरण न राबवता शहरात रस्ते, पालिकेचे उद्यान, मैदान येथे सर्रास फटाके विक्रीच्या परवानग्या दिल्या आहेत. पालिकेने फटाके विक्र ी तसेच फोडण्यासाठी असे उघड प्रोत्साहन दिले असतानाच दुसरीकडे पोलिसांनीसुद्धा फटाके फोडण्यासाठी मोकळे रान दिले. मंगळवारपासून शहरात मध्यरात्री एक ते दीड वाजेपर्यंत सर्रास ध्वनी आणि वायुप्रदूषण करणारे फटाके फोडले जात आहेत. वास्तविक, रात्री १० वाजेपर्यंतच वेळ असताना बिनधास्त फटाके फोडताना दिसत आहेत. लोकांनी पोलिसांना तक्रारी करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा अनुभव भार्इंदर, काशिमीरा,नया नगर पोलीस ठाण्यांकडून आला. भार्इंदर व नया नगर पोलीस ठाण्याचा तर नंतर फोनच घेतला जात नव्हता.पोलीस महासंचालक व ठाणे ग्रामीणच्या कंट्रोल रूममध्ये तक्रारी करूनसुद्धा पोलिसांकडून कार्यवाहीच झाली नाही. त्यामुळे दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न सुनील भगत व अन्य नागरिकांना पडला आहे.आम्ही फटाक्यांच्या पूर्णपणेविरोधातच आहोत. कारणआवाज व धुराचा ज्येष्ठ, रु ग्ण, लहानमुलं यांना खूपच त्रास होतो. मुख्यमंत्रीयांनी फटाके न फोडण्याच्या केलेल्याआवाहनानुसार शहरात भाजपासुद्धाजनजागृती करेल. पोलीस आणिपालिका प्रशासनाची जबाबदारी आहेचपण त्याचबरोबर सुशिक्षित आणिजागरूक नागरिकांनीसुद्धा फटाकेफोडणे टाळले पाहिजे. सर्वोच्चन्यायालयाने दिलेल्या वेळेचे पालनकेले पाहिजे.- हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजपासर्वोच्च न्यायालयानेदिलेले आदेश आणिमुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन याचेपालन सर्वांनीच केले पाहिजे. कारणलोकांचे आरोग्य व पर्यावरणसंरक्षणासाठी हे गरजेचे आहे .पोलीस आणि पालिकेची जबाबदारीआहे. यात वाद किंवा मतभेदअसण्याचे कारण नाही. आजदिल्लीची जी घातक स्थिती झालीआहे त्याचा आपण आतापासूनचगांभीर्याने विचार केला पाहिजे.- सुरेश खंडेलवाल,विधि व नियोजन समिती सभापतीमीरा-भार्इंदरमध्ये फटाकेविक्रे त्यांवर गुन्हा दाखलकरण्याची कार्यवाही सुरू आहे .फटाके फोडण्याची ठिकाणे व्यापकअसली तरी पोलीस आलेल्यातक्रारीनुसार घटनास्थळी गेले असताफटाके वाजवणारे पळून जात वापोलिसांची गाडी लांबूनच पाहून तेफटाके फोडणे बंद करत. पोलीसठाण्यांनी फोन का घेतले नाहीतयाची चौकशी सुरू आहे.- युवराज कलकुटगे,पोलीस उपनिरीक्षक व जनसंपर्कअधिकारी, ठाणे ग्रामीण
मीरा-भार्इंदरमध्ये मध्यरात्रीही फटाक्यांचा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 3:29 AM