राजू काळेभार्इंदर :मीरा-भार्इंदर महापालिकेने रस्त्यांवर बेवारस स्थितीत उभ्या वाहनांवर जप्तीची कारवाई सुरु केली असली तरी बेवारस रिक्षा मात्र तशाच ठेवल्या आहेत. अशा बेवारस रिक्षांमध्ये रात्रीच्या वेळी सर्रास मद्यपान सुरु असते. स्थानिकांना त्याचा त्रास होऊनही त्या रिक्षांवर कारवाई होत नाही. शहरात आडवाटेला उभ्या केलेल्या बेवारस वाहनांवर पालिकेने जप्तीची कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र ती वाहने वाहतुकीला अडथळा ठरत नसल्याचा दावा करीत त्यावर कारवाई टाळली जात आहे. बेवारस वाहनांमध्ये पावसाचे पाणी साठून त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. सध्या पावसाळ्यात विविध आजारांच्या साथी असताना, हे धोक्याचे आहे.शाळेजवळील त्या बेवारस रिक्षांची माहिती घेऊन त्वरीत संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले जातील.- दीपक पुजारी, उपायुक्त, अतिक्रमण विभागवाहतूक शाखा व पालिका अधिकाºयांच्या सहकार्याने त्या बेवारस रिक्षांवर कारवाई केली जाईल.- दत्तात्रेय बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भार्इंदर पोलीस ठाणे.या बेवारस रिक्षांवर कारवाई करण्याबाबत अनेकदा पालिकेला तक्रारी केल्या. परंतु, अद्याप कारवाई झालेली नाही.-धनेश बामणे, अध्यक्ष, युवा प्रतिष्ठानशाळेच्या परिसरात रिक्षांमध्ये आक्षेपार्ह घडल्यास जबाबदार कोण?च्बेवारस वाहनांचा गैरफायदा अनैतिक व्यवसायासाठी घेतला जात आहे. भार्इंदर पश्चिमेकडील सेकंडरी शाळेच्या परिसरात अनेक बेवारस रिक्षा उभ्या असून त्यामध्ये रात्रीच्यावेळी चक्क मद्यपानाचे कार्यक्रम चालतात. सकाळच्या वेळी या बेवारस रिक्षांमध्ये काही रोडरोमियो बसून शाळेतील विद्यार्थींना त्रास देतात.च्शाळेच्या परिसरातील रिक्षांमध्ये काही आक्षेपार्ह प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पालिकेने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने त्या बेवारस रिक्षांवर जप्तीची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेवारस रिक्षात मद्यपींचा अड्डा, रोडरोमिओचाही उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 4:08 AM