मुंब्रा : नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रर (एनपीआर) साठी घरी येणाºया गणकाचे घरोघरी स्वागत करण्याचा, परंतु त्यांना कुठलीही कौटुंबिक माहिती न देण्याचा तसेच कागदपत्रे न दाखवण्याचा निर्धार मुंब्रा येथे गेली छत्तीस दिवस आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी केला आहे.समाजमाध्यमांसह घरोघरी जात जनजागृती सुरु असल्याची माहिती आंदोलनात सहभागी महिलांनी दिली. मागील दोन महिन्यांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या धर्तीवर मुंब्य्रातील अग्निशमन केंद्रासमोर सीएए, एनपीआर, एनआरसी विरोधात महिलांनी सुरु केलेले आंदोलन मंगळवारी छत्तीसाव्या दिवशीही सुरु आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला इतर महिलांना संविधानातील तरतुदींची माहिती देऊन जनजागृती करीत आहेत. आतापर्यत समाजसेविका मेधा पाटकर, म. गांधी यांचे पणतू तुषार गांधी, निवृत्त पोलीस अधिकारी समशेर पठाण, आंतरराष्ट्रीय व्याख्याता त्रिशला शेट्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आहे.
जनगणना अधिकाऱ्यांशी असहकाराचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 1:21 AM