पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : प्रसूती म्हटले तरी महिलेचा एकप्रकारे पुनर्जन्मच असतो. त्यातच महिलांना प्रसूतीदरम्यान होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी बहुंताश खाजगी रुग्णालयात सिझर करणेही एक फॅशनच झाली आहे. मात्र, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात सिझरपेक्षा नॉर्मल प्रसूतीला पहिली पसंती दिली जात आहे. त्यामुळे या रुग्णालयात सिझरद्वारे प्रसूतीचे प्रमाण अवघे १८ ते १९ टक्के इतकेच आहे. अशाप्रकारे ठाणे जिल्हा सामान्य (शासकीय) रुग्णालयाने सिझर प्रसूतीच्या जमान्यात आपले एक वेगळेपण जपले आहे. तर आवश्यकता भासली तरच येथे सिझर पद्धतीने प्रसूती केली जात असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.ठाणे आणि पालघर असे वेगवेगळे जरी दोन जिल्हे झालेले असले तरी अजून या दोन्ही जिल्ह्यातून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या हजारो गोरगरीब रुग्णांनी हे रुग्णालय नेहमीच गजबजलेले असते. त्यातच जिल्हा रुग्णालयात मागील वर्षभरात सुमारे तीन हजार ३०० प्रसूती झाल्या असून, त्यामध्ये ८०० च्या आसपास सिझरद्वारे प्रसूती झाल्या आहेत. २०१७ या वर्षातील एप्रिल आणि मे एकूण ५८९ प्रसूती झाल्या आहेत. यामध्ये एप्रिल महिन्यात १८२ नॉर्मल आणि ८४ सिझर तसेच मे महिन्यात २२२ नॉर्मल आणि १०१ सिझर प्रसूती झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जिल्हा रुग्णालयाची नॉर्मल प्रसूतीला पसंती
By admin | Published: June 23, 2017 5:50 AM