शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

आंदोलक नव्हे, समाजकंटक!

By admin | Published: August 13, 2016 3:59 AM

वेगवेगळ्या कारणांमुळे सतत लोकल वाहतुकीत होणारा खोळंबा, उशिराने धावत असूनही मेल-एक्स्प्रेसना मार्ग काढून देत कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल वाहतुकीला

बदलापूर : वेगवेगळ्या कारणांमुळे सतत लोकल वाहतुकीत होणारा खोळंबा, उशिराने धावत असूनही मेल-एक्स्प्रेसना मार्ग काढून देत कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल वाहतुकीला दररोज केला जाणारा विलंब आणि सलग चार दिवस गाड्यांना होत असलेल्या विलंबामुळे-त्याची कोणतीही माहिती दिली जात नसल्याने बदलापूर रेल्वे स्थानकात पहाटेपासूनच संतप्त प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केल्यानंतरही ‘हे आंदोलन समाजकंटकांचे आंदोलन’ असल्याची संभावना रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी केली.मात्र, हे वक्तव्य कशाच्या आधारावर केले, त्याचा तपशील ते देऊ शकले नाहीत. पण, या आंदोलनाच्या हेतूबद्दलच त्यांनी संशय व्यक्त केला.पहाटेपासून प्रवाशांनी वाहतूक रोखून धरल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी टिष्ट्वट केल्यावर ओझा बदलापूरला येण्यास निघाले. मात्र, ते पोहोचले तोवर आंदोलनाची धग कमी झाली होती. रेल्वेचे अधिकारी, पोलिसांकडून त्यांनी आंदोलनाबद्दल माहिती घेतली. आंदोलक प्रवाशांचे म्हणणे ऐकले. पण, एकही ठोस आश्वासन ते देऊ शकले नाही. जी कामे सुरू आहेत, त्यांची तीच ती आश्वासने देऊन त्यांनी प्रवाशांची बोळवण केली. लोकल वाहतुकीला उशीर होत असल्याचा प्रवाशांचा आरोपही त्यांनी नाकारला आणि अवघ्या दोनतीन मिनिटे उशिराने गाड्या धावत असल्याचा दावा करत त्यांनी या परिसरातील लाखो प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले. या आंदोलनाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. पहाटेची लोकल नेहमी विलंबाने येते, हा प्रवाशांचा आरोप त्यांनी फेटाळला. गेल्या चारपाच दिवसांत ही लोकल केवळ दोन ते तीन मिनिटे विलंबाने धावल्याचे ते म्हणाले. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने शुक्रवारी ही लोकल २० मिनिटे विलंबाने आली. मात्र, काही लोकांनी आक्रोश करत ही लोकल रोज उशिरा येते, असे म्हणत आंदोलनाला सुरुवात केली. नंतर, हे आंदोलन वाढतच गेले. आंदोलनाचे कारणच चुकीचे असल्याचे ते म्हणाले.बदलापूर गाड्या वाढवा बदलापूरहून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बदलापूरहून सुटणाऱ्या गाड्यांची संख्याही त्या प्रमाणात वाढायला हवी. ही संख्या वाढत नसल्यानेच प्रवाशांचा उद्रेक झाला. - अश्विनी सावंत, प्रवासीठाणे, कल्याणचे थांबे नकोमुंबईहून बदलापूर आणि कर्जतसाठी सुटणाऱ्या गाड्यांना ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांत थांबा देऊ नये. या तिन्ही शहरांतील प्रवासी बदलापूर आणि कर्जत लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे बदलापूरच्या प्रवाशांना या गाड्यांत चढता येत नाही. - शिल्पा पाटकर, प्रवासीस्थानकातील गैरसोयी दूर कराबदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. गर्दीच्या वेळी अर्धाअर्धा तास लोकल नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. ही गैरसोय दूर करणे गरजेचे आहे. - योगेंद्र कोंडीलकर, विद्यार्थीअंबरनाथ गाड्या बदलापूरला आणाबदलापूरकरांची गैरसोय तातडीने थांबवण्यासाठी अंबरनाथहून सुटणाऱ्या गाड्या बदलापूरपर्यंत आणाव्या. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढेल. बदलापूर स्थानकातील ताण कमी होण्यास मदत होईल. - रिगल गजभी, प्रवासीउभे राहण्याची शिक्षा नकोबदलापूर, कर्जत आणि खोपोलीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये कमी सीट असलेल्या लोकलचाही समावेश केला आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना दोन ते अडीच तास उभे राहून प्रवासाची शिक्षा सहन करावी लागते. ही गैरसोय थांबायला हवी. - सविता दूधवडकर, प्रवासी