कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मार्च महिन्यात महासभेने मंजुरी दिली. त्याला दोन महिने उलटले, तरी अद्याप अर्थसंकल्प पुस्तिकाच तयार न झाल्याने कर्च कशाच्या आदारावर करायाचा असा प्रश्न वेगवेगळ््या खात्यांना पडल्याने सध्या विकासकामे ठप्प झाली आहेत. त्याचा फटका पावसाळापूर्व कामांना बसला आहे. अर्थसंकल्पाच्या अनास्थेविषयी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून सत्ताधारी आणि प्रशासन नागरी सुविधांबद्दल किती गंभीर आहेत, याचा प्रत्यय येत असल्याची टीका केली. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा करून स्थायी समितीने अर्थसंकल्प १,९५० कोटींवर नेला. त्यातील प्रकल्प वाढवले. त्यावर चर्चा झाली. बदल करण्यात आले. नंतर त्याला मंजुरी दिल्यावर महासभेने त्यात सुधारणा केली. २५० कोटी रुपयांची केली. महापौरांनी काही उपसूचना केल्या. त्यानंतर हा अर्थसंकल्प २२०० कोटींच्या घरात गेला. ७ मार्चला महासभेने अर्थसंकल्पास मंजुरी दिली. तरीही अद्याप त्याचे छापील पुस्तक तयार झालेले नाही. विविध विकास कामांसाठी अर्थिक तरतुदी होऊनही ती सुरू होत नसल्याने लोकप्रतिनिधींकडून विचारणा झाल्याने ही बाब उघड झाली. कर्च कोणत्या शीर्षकाखाली करायचा, असा पेच वेगवेगळ््या खात्यांपुढे आहे. अर्थसंकल्पाचे पुस्तक किती काळात चापावे, याची कालमर्यादा नसली तरीही दोन महिने उलटल्याने पावसाळापूर्व कामांना त्याचा फटका बसला आहे. (प्रतिनिधी)हा मुद्दा विरोधी पक्षनेते भोईर यांनी उचलून धरला आहे. स्थायी समिती सभापतींनी गटारे आणि पायवाटांना फाटा दिला होता. मात्र सदस्यांच्या मागणीनुसार महापौरांनी उपसूचना मान्य करीत स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात आणखी २५० कोटीची वाढ करुन गटारे-पायवाटांची परंपरा कायम ठेवली आहे.
अर्थसंकल्प पुस्तिकाच नाही
By admin | Published: May 03, 2016 12:46 AM