शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

माफक वैद्यकीय सुविधांसह पुरेसे पाणीही नाही; आढावा आमदार नरेंद्र मेहतांच्या मतदारसंघाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:22 AM

मुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, चौक व उत्तनवासीयांसाठी घरदुरुस्ती परवानगीची प्रक्रिया सुलभ नाही

२०१४ च्या निवडणुकीत आ. नरेंद्र मेहतांनी वचननाम्यात अनेक आश्वासनं दिली होती. प्रबळ इच्छाशक्ती आणि शासकीय धोरण वा निधीअभावी बरीच आश्वासनं अपूर्ण राहिली. सत्ता असूनही पालिकेच्या जोशी ( टेंबा ) रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा व ट्रॉमा सेंटर सुरू करण्याचे सोडाच, पण अत्यावश्यक असे आॅपरेशन थिएटर, आयसीयू, एनआयसीयूदेखील सुरू करता आले नाही. त्यामुळे काही रुग्णांना प्राण गमवावे लागले.आमदार : नरेंद्र मेहता, भाजपमतदारसंघ : मीरा-भाईंदरटॉप 5 वचनं

  • २४ तास पाणी व नवीन नळजोडण्या
  • खड्डेमुक्त सिमेंट रस्ते
  • ट्रॉमा सेंटर सुरू करणे
  • स्वतंत्र पोलीस आयुक्तालय
  • जुन्या इमारतींसाठी वाढीव चटईक्षेत्र

त्यांना काय वाटतं?मतदारसंघासाठी सर्वात जास्त निधी मिळवणाऱ्या राज्यातील १० आमदारांमध्ये मी एक असेन. आमदार निधीसोबतच ५० कोटींचा विशेष निधी आणला. ७५ दशलक्ष पाणीयोजना व एकात्मिक नाले विकास योजनेत पालिकेला ९० कोटींचे अनुदान मिळवून दिले. सिमेंट रस्त्यांसाठी १०० कोटींचे कर्ज मंजूर करून दिले. आश्वासने तर पाळलीच, उलट जास्त कामं केली. एमएमआरडीएचा निधी शहराला मीच पहिल्यांदा मिळवून दिला. - नरेंद्र मेहता, आमदारवचनांचं काय झालं?

  • २४ तास पाणी नाही; पण सुधारणा
  • रस्ते खड्डेमय, काही सिमेंट रस्ते झाले
  • ट्रॉमा सेंटर अद्यापही नाही
  • संयुक्त पोलीस आयुक्तालयाची घोषणा
  • चटईक्षेत्राअभावी पुनर्विकास रखडला

अवास्तव करवाढमुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, चौक व उत्तनवासीयांसाठी घरदुरुस्ती परवानगीची प्रक्रिया सुलभ नाही. जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी परवानग्या मिळत नाहीत. बेकायदा बांधकामेही होत आहेत. या गावांमध्ये भूमिगत गटारयोजना नसताना मलप्रवाह सुविधा लाभकर वसूल केला जातो. अवास्तव करवाढही लादली आहे. - दुष्यंत भोईरस्टेडियमचा थांगपत्ता नसला तरी, तत्कालिन खासदार संजीव नाईक व पालिका यांच्या माध्यमातून क्रीडा संकुल सुरु झाले. पण सामान्य नागरिक व मुलं अवास्तव शुल्कामुळे या सुविधेपासून वंचित आहेत. - सूनिल गायकवाडका सुटले नाहीत प्रश्न?मीरा-भाईंदर मार्गावर सात उड्डाणपूल बांधणार होते. प्रत्यक्षात एकही झाला नाही. मेट्रोच्या खाली पूल बांधणार असल्याचं सांगितलं जातंय, पण कामाला सुरुवात नाही. मीरा रोड पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल अधांतरीच आहे. झोपडपट्टीवासीयांना नळजोडणी नाही. मोफत उपचार नाही. शौचालयं अस्वच्छ आणि तीही नाममात्रच आहेत. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी जास्तीचे चटईक्षेत्र मिळालेले नाही. त्यामुळे इमारतींचा पुनर्विकास रखडला. असंख्य कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत.पाच वर्षांत काय केलं?आमदारकीपेक्षा मेहतांनी महापालिकेतच जास्त लक्ष दिले आहे. मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याने त्यांनी विकासकामांसाठी पाठपुरावा केला, निधी आणला, ही वस्तुस्थिती आहे. एमएमआरडीएने कधी नव्हे ती विकासकामं हाती घेतली. मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा शहरात आणले. पण, त्याचबरोबर व्यक्तिगत लाभाचे आणि अन्य काहींच्या लाभाचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. मनमानी, विविध प्रकरणं व कारणांनी वादग्रस्त ठरलेले मेहता टीका, आरोपांचेदेखील धनी ठरले.200 पेक्षा जास्त मर्सिडिज, व्होल्वोसारख्या लक्झरी बस परिवहनसेवेसाठी आणण्याचे आश्वासन दिले होते. पण, आज जेमतेम ३५ खटारा झालेल्या बस सुरू आहेत. शहरासाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू होऊ शकले नाही. मीरा-भार्इंदरसाठी न्यायालयाची मंजुरी आधीच मिळाली होती, पण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मीरा-भार्इंदरला तालुका घोषित करून तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात मेहतांना यश आले आहे. फेरीवालामुक्त पदपथ तसेच मोकळे रस्ते देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात फेरीवाले व वाहतूककोंडी वाढून जाच वाढला.मतदारसंघाला काय हवं?

  • समान व पुरेसा पाणीपुरवठा
  • मोकळे रस्ते व पदपथ
  • मुबलक पार्किंग व वाहतूककोंडीतून मुक्ती
  • माफक व चांगल्या शैक्षणिक संस्था
  • चांगली व माफक वैद्यकीय रुग्णालयं
टॅग्स :BJPभाजपा