शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

इशरतच्या आईला संरक्षण शुल्काची नोटीस

By admin | Published: January 11, 2017 5:00 AM

पोलीस संरक्षण पाहिजे असल्यास दररोज एक हजार सातशे २३ रुपये शुल्क भरण्याची नोटीस गुजरात पोलिसांच्या चकमकीत साडेबारा वर्षांपूर्वी ठार झालेल्या इशरत जहाँच्या

मुंब्रा : पोलीस संरक्षण पाहिजे असल्यास दररोज एक हजार सातशे २३ रुपये शुल्क भरण्याची नोटीस गुजरात पोलिसांच्या चकमकीत साडेबारा वर्षांपूर्वी ठार झालेल्या इशरत जहाँच्या आईला ठाणे पोलिसांनी धाडली आहे. विद्यमान पंतप्रधान आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची कथित हत्या करण्यासाठी गुजरातमध्ये मित्राबरोबर गेलेल्या मुंब्य्रातील इशरत या तरुणीसह अन्य तिघांना १५ जून २००४ रोजी गुजरात पोलिसांनी अहमदाबाद येथे चकमकीत ठार केले. त्यानंतर चकमक खरी होती की खोटी याचा न्यायनिवाडा व्हावा, यासाठी काही समाजसेवकांनी गुजरातमधील उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. त्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी गुजरात, दिल्लीत गेल्यावर तसेच मुंब्य्रातही काही जण पाठलाग करीत असल्याचा दावा इशरतच्या आईने तसेच तिच्या सहकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे तिला २४ तास नि:शुल्क सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आले होते. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा ठाणे पोलिसांच्या संरक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर इशरतच्या आईला यापुढे सशुक्ल संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)पोलीस संरक्षणासाठी शुल्क भरण्याची नोटीस मिळाली आहे.  परंतु पैसे भरण्याएवढी माझी आर्थिक स्थिती नाही. वकिलामार्फत तसे पोलिसांना कळवले आहे.- शिममा कौसर शेख, इशतची आई