- मुरलीधर भवार कल्याण : ओला-सुका कचरा वर्गीकरणासाठी केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील पाच हजार सोसायट्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यापैकी २१९ सोसायट्यांनी कचरा वर्गीकरणासाठी पुढाकार घेत ओल्या कचºयापासून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. तर, सुका कचरा या सोसायट्या घंटागाडीत जमा करत आहेत. अन्य सोसायट्यांनीही पुढाकार न घेतल्यास महापालिका त्यांचा कचरा घेणे बंद करणार आहे.महापालिका हद्दीतील २० हजार चौरस मीटर आकारमानाच्या ३० सोसायट्यांनी त्यांच्या कचºयाची विल्हेवाट सोसायटीच्या आवारात लावणे बंधनकारक आहे. या सोसायट्यांचा कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा महापालिकेने दोन वर्षांपूर्वी दिला होता. तसेच जास्त सदनिका असलेल्या सोसायट्यांनीही त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. महापालिकेने त्यासाठी यापूर्वीच ३५ हजार नोटिसा विविध सोसायट्यांना पाठविल्या होत्या. त्यामुळे महापालिका व सोसायट्या यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. महापालिकेने प्रक्रिया प्रकल्प उभारलेले नसताना कशाच्या आधारे कचरा वर्गीकरणाची सक्ती केली आहे, असा सवाल त्यावेळी उपस्थित झाला होता. त्यामुळे महापालिका तेव्हा बॅकफूटवर गेली होती.आता उंबर्डे व बारावे येथे १० टन क्षमतेच्या कचºयापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प आहे. तसेच प्लास्टिक कचºयापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प बारावे येथे कार्यान्वित आहे. डोंबिवलीतही आयरे येथे बायोगॅस प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पांना पुरेसा ओला कचरा जात नाही. त्यामुळे हॉटेलमधील उष्टे-खरकटे अन्न, बाजारातील भाजीपाल्याचा कचरा प्रकल्पास जात आहे. सोसायट्या त्यांच्या आवारात ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करीत आहेत. आयरे येथील बायोगॅस प्रकल्पास सात टन ओला कचरा जातो. तर, उंबर्डे प्रकल्पास पाच टन ओला कचरा प्रक्रियेसाठी जातो. सोसायट्यांमध्ये ओल्या कचºयापासून खतनिर्मिती केली जात असल्याने जवळपास साडेपाच टन ओला कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर जात नाही, अशी माहिती सहायक आयुक्त गणेश बोराडे यांनी दिली.घनकचरा विभागाने डोंबिवलीतील दत्तनगर जलकुंभानजीक तसेच कल्याणमध्ये लोकधारा येथे सुका कचरा वर्गीकरणाची शेड उभारली आहे. अन्य आठ प्रभागांत अशाच प्रकारची कचरा वर्गीकरणाची शेड उभारली जाणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी नागरिकांचा कचरा वर्गीकरणाच्या शेड उभारणीस विरोध असल्याने काम मागे पडले आहे.कचरा वर्गीकरण करणाºया सोसायट्यारिजन्सी, रौनक, गुरू आत्मन, आनंदसागर, मंगेशी हाइट्स, मेट्रो मॉल, मेट्रो रेसिडेन्सी, लोकवाटिका, लोकग्राम, मोहन सृष्टी, द्वारकानगरी, श्रीहरी कॉम्प्लेक्स, वृंदावन सोसायटी, शुभम हॉल, अंबिका पॅलेस, विश्वनाथ सोसायटी, बालाजी गार्डन, लोढा हेवन, स्वामी विवेकानंद शाळा, औद्योगिक वसाहतीमधील दोन सोसायट्या आदी २१९ सोसायट्यांचा समावेश आहे.
पाच हजार सोसायट्यांना बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:14 AM