मीरा रोड : भराव करण्यासाठी माती, दगड फुकट मिळतात, म्हणून भराव करून घेत असाल, तर सावधान! कारण, बेकायदा मातीभराव केल्याप्रकरणी महसूल विभागाने विकासक, मालकांना गौण खनिजाच्या लाखो रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत. दंड न भरल्यास जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर, रात्रीअपरात्री हे भरावमाफिया आमच्या जागेत भराव करतात, असे सांगत काही शेतकऱ्यांनी पालिका, पोलीस व महसूल विभागाने या भरावमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.रस्त्याच्या कडेला, कांदळवन, पाणथळ, सीआरझेड क्षेत्रासह अगदी सरकारी व खाजगी मोकळ्या जागांमध्ये भराव करतात. बहुतांश जमीनमालक, शेतकरी, विकासकही फुकटचा भराव करून मिळत असल्याने तेही आपल्या जागेत भराव करून घेत प्लॉट तयार करून घेतात. शहरात काही भरावमाफिया सक्रिय असून मिळेल तिकडे गाड्या रिकाम्या करतात. २० ते २५ फुटांपर्यंत भराव केले जातात.भराव रोखण्यासाठी पालिकेने पथके नेमली असली, तरी ही पथके काहीच कारवाई करत नाहीत. पोलीसही माफियांना सांभाळण्याचे काम करतात. महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी मनुष्यबळाची कमतरता व अन्य कामांसाठी ठाण्यात असल्याचे कारण पुढे करतात. परंतु, भराव केल्याप्रकरणी आता महसूल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याने त्यातील दंडाची रक्कम पाहून सामान्य शेतकºयांचे डोळे पांढरे झाले आहेत.महसूल विभागास गौण खनिजभराव दंडाची रक्कम न भरल्यास जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे जमिनीत आपल्या सहमतीशिवाय भराव करणाºया माफियांपासून संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी शेतकरी, जमीनमालकांवर आली आहे.नवघर येथील सुहास पाटील म्हणाले की, आमच्या जमिनीत रात्रीअपरात्री माफियांनी भराव केला आहे. आता सरकारने भरावापोटी ७१ लाखांचा दंड भरण्याची नोटीस दिली आहे. चूक नसताना शेतकºयांनी इतके पैसे भरायचे कशाला, असा सवाल त्यांनी केला. मोर्वा गावातील कुंदन भोईर यांनीही आम्ही भराव केला नसताना दंडाची नोटीस आल्याचे म्हटले आहे. तर, गोडदेव गावातील सचिन घरत म्हणाले की, आमच्या जागेत बळजबरीने भराव केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सतत करूनही कारवाई केली जात नाही.>भरावमाफियांना अद्दल घडवूभरावमाफियांना रोखण्याची जबाबदारी शेतकरी, जमीनमालकाची आहे. पण, रात्री गौण खनिजवाहतुकीला बंदी असताना तसेच दिवसाही अशा वाहनांसह भराव करणाºयांवर पोलीस, पालिका व महसूल विभागाने कारवाई केली पाहिजे. ते जर कारवाई करणार नसतील, तर भरावमाफियांना शेतकरी अद्दल घडवतील व त्याची जबाबदारी या सर्व यंत्रणांची असेल, असा इशारा आगरी एकता समाजचे प्रशांत म्हात्रे यांनी दिला आहे. जागेवर भराव झालेला आहे, हे सत्य आहे. स्वत:च्या जमिनीचे संरक्षण स्वत:च केले पाहिजे. कारण, भराव हा स्वत:च्या फायद्यासाठी करून घेतला जातो. त्यामुळे दंड हा लागणारच, असे एका अधिकाºयाने सांगितले.
भराव केलेल्यांना लाखो रुपये दंडाच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:02 AM