शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
2
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
3
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
4
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
5
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
6
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
7
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
8
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
9
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
10
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
11
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
12
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
13
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
14
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
15
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
16
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
17
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
18
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
19
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
20
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये आता 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान

By सुरेश लोखंडे | Published: December 30, 2023 6:48 PM

५१ लाखांपर्यंत बक्षिसे!

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान ठाणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक व उत्तम नाविण्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शाळांना राज्य शासनाकडून एक लाखापासून ५१ लाखांपर्यंतची बक्षिसे उत्कृष्ट उपक्रमास प्राप्त हाेणार आहेत. यासाठी महापालिकां क्षेत्रातील शाळांसह जिल्ह्यातील तालुक्यांमधील माध्यमिक व प्राथिमिक शाळांना सहभागी हाेण्याची संधी आहे.

या अभियानासाठी शाळांची अशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशी विभागणी करण्यात आली आहे. प्राथमिकपासून राज्यस्तरापर्यंत प्रत्येक स्तरातील विजेते या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येणार आहेत.तालुका, जिल्हा तसेच विभागीय पारितोषिके दिली जाणार आहेत. राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी पहिले पारितोषिक ५१ लाख रुपये, दुसरे पारितोषिक २१ लाख रुपये आणि तिसरे पारितोषिक ११ लाखांचे राहणार आहे, यासाठी ठाणे जिल्ह्यातील शाळांसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी त्यांच्या जिल्ह्यशतील शाळांना परिपत्रके काढून माेठ्या संख्येने सहभागी हाेऊन विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या विद्यार्थीकेंद्रित अभियानाचा कालावधी ४५ दिवसांचा आहे. आरोग्य आर्थिक आणि कौशल्य विकासावर यातून भर दिला जाणार आहे. भौतिक सुविधा पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व अन्य अभियान उपक्रमातून राबविले जाणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करणे, अध्ययन-अध्यापन आणि प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक आणि आनंददायी वातावरण निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अभियान राबविले जात आहे.  जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. विजेत्या शाळांना रोख पारितोषिक दिली जाणार आहेत. यासाठी शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे. शाळांमधील शिक्षक, पालक विद्यार्थी, माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये हे अभियान हाती घेण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी प्राथमिकस्तरावर केंद्र प्रमुख, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, खासगी अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सेवाज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक शिक्षणाधिकारी, संबंधित उपशिक्षणाधिकारी तसेच राज्यस्तरावर निर्देशित अधिकारी मूल्यमापन करतील. मुल्यमापनानंतर रोख पारितोषिकांचे वितरण होईल.

टॅग्स :thaneठाणे