लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता शहर आणि जिल्हयाबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई पास आवश्यक केला आहे. वैद्यकीय अत्यावश्यक कारणांसाठी जिल्हयाबाहेर जाणाऱ्यांना सक्षम प्राधिकरणाद्वारे हा ई पास दिला जाणार असल्याची माहिती ठाणेपोलिसांनी दिली.जवळच्या नातेवाईकाचे निधन झाले असल्यास, लग्नसमारंभ, रुग्णालयीन आणीबाणीचे काम आणि वैद्यकीय सेवा अशा प्रकारच्या अत्यावश्यक सेवांसाठी एका जिल्हयातून दुसºया जिल्हयात किंवा शहरात जाण्यासाठी पोलिसांतर्फे ई पास सुविधा देण्यात येणार आहे. संबंधितांनी (https://covid19.mhpolice.in/ )पोलिसांनी दिलेल्या लिंकवर अर्ज केल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यावश्यक प्रवासासाठी खासगी व्यक्तींना या प्रवासाची अनुमती दिली जाणार आहे. अर्ज केल्यानंतर संबंधितांना अर्जावर टोकन क्र मांक दिला जाणार आहे. त्यानंतर संबंधित परिमंडळाचे पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर साधारण २४ तासांमध्ये अर्ज मंजूर केला जाणार आहे. जर कारण अयोग्य असल्यास हा अर्ज नामंजूर होऊ शकतो. यामध्ये अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय सेवा त्याचबरोबर मेडिकल सेवांशी संबंधितांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे प्रवास करता येणार आहे. त्यांना अशा ई-पास ची आवश्यकता नाही.* ज्या खाजगी व्यक्ती अत्यावश्यक सेवेशी संबंधित नाहीत, ज्यांना विशेष कारणासाठी शहराबाहेर किंवा आंतरजिल्हा प्रवास करण्याची गरज आहे, त्यांनीच असे पास मिळण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांकडून उभारलेल्या जिल्हा आणि शहरांच्या सीमेवर हे पास तपासले जाणार आहेत. जर असा पास नसल्यास संबंधितांना पुन्हा आपल्या शहरात माघारी फिरावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता ठाणे जिल्हयातून बाहेर पडणाऱ्यांसाठी पोलिसांचा ई पास आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 6:42 PM
राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आता शहर आणि जिल्हयाबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई पास आवश्यक केला आहे. वैद्यकीय अत्यावश्यक कारणांसाठी जिल्हयाबाहेर जाणाऱ्यांना सक्षम प्राधिकरणाद्वारे हा ई पास दिला जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
ठळक मुद्दे अत्यावश्यक कामांसाठी दिला जाणार पास ठाणे पोलिसांची माहिती