शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

आता आॅनलाइनद्वारे भरा कर; केडीएमसीने दिले पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 3:40 AM

केडीएमसी हद्दीतील नागरिकांना विविध कर व सेवा शुल्क भरण्यासाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये आता रांगा लावण्याची गरज नाही.

कल्याण : केडीएमसी हद्दीतील नागरिकांना विविध कर व सेवा शुल्क भरण्यासाठी महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये आता रांगा लावण्याची गरज नाही. आॅनलाइन पद्धतीने करभरणा करण्यासाठी महापालिकेने त्यांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच आॅफलाइन पद्धतही सुरूच राहणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली आहे.विविध प्रकारचे कार्ड, नेट बँकिंगद्वारे नागरिकांना आॅनलाइन पेमेंट करता येणार आहे. सेवा कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांचे शुल्कही स्वीकारले जाते. आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि एसबीआय या बँकांचे पेमेंट गेटवे २०१६ पासून सुरळीत सुरू आहे. ‘स्मार्ट केडीएमसी’ या मोबाइल अ‍ॅप्सद्वारे पैसे भरण्याचा पर्याय आहे. नागरिकांनी भरलेली रक्कम व त्याच्या पावत्या या अ‍ॅप्सद्वारे उपलब्ध करून देता येतील.इंडसइंड बँकेच्या काउंटरवरही नागरिक कर भरू शकतात. तसेच आयसीआयसी बँकेच्या देशभरातील कोणत्याही शाखेतून मालमत्ताकर व पाणी बिल भरता येऊ शकते, असे महापालिकेने कळवले आहे.कॅशलेस पेमेंट व डिजीटल सेवेचा नागरिकांनी वापर करावा, यासाठी महापालिकेने या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ‘दी भारत बिल पेमेंट’द्वारे (बीबीएस) विविध सरकारी सेवांची देयके भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. या यंत्रणेशी महापालिकेची यंत्रण लवकरच जोडली जाणार आहे. आरटीजीएस व एनईएफटीद्वारे पेमेंट जलद गतीने व पारदर्शक रक्कम अदा करण्यासाठीही सुविधा लवकरच सुरू केली जाणार आहे. क्युआरटी कोड हा नागरी सुविधा केंद्राच्या काउंटरवर उपलब्ध असेल, असे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.घरी जाऊनही देयके स्वीकारणारमहापालिकेच्या संकेतस्थळावरून पैसे भरताना डायनामिक क्युआर कोड उपलब्ध असेल. नागरी सुविधा केंद्रांवरही डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे बिल भरता येणार आहे.‘क्विक पे’ सेवेनुसार नागरिकांना कोणत्याही पुनर्नोंदणीशिवाय विविध प्रकारची देयके भरता येणार आहे. याशिवाय आधार, भीम, आयएमपीएस, यूपीआय, मोबाइल वॅलेट, एनएसीएच या सुविधाही उपलब्ध आहेत.नागरिकांच्या घरी जाऊन देयके स्वीकारण्याची अनोखी सुविधा देण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाonlineऑनलाइन