शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्याची हीच वेळ - नाना पटोले

By अजित मांडके | Published: June 20, 2024 10:00 PM

कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकसभा निवडणूक महायुतीने षडयंत्रणे जिंकली आहे. मात्र आता ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या निवडणुकीला एकजुटीने आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बदला घेण्यासाठी ही निवडणूक लढायची असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. 

कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांचे कोकणामध्ये काहीच नाही असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक इविहीएम जिंकली. मात्र बॅलेटनेच मतदान झालं पाहिजे हे या देशातील जनतेचे मत आहे, मात्र इविहीएम मुले आपल मत ज्याला देतोय त्याला जात की नाही हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळं  या निवडणुकीत धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी हे कळेल असेही ते म्हणाले. लोकसभेत धनशक्ती जिंकली मात्र आता जनशक्ती जिंकून दाखवून द्या असे आवाहन ही त्यांनी केले.

दबावाचे राजकारण ठाणे जिल्ह्यात केले जाते. मात्र घाबरणारे व्यवस्था इथे नाही. ठाणे जिल्ह्यात आमच्याकडे सगळे टायगर आहेत. लोकसभेत जिंकले ही हवा त्यांच्या डोक्यात आहे. ही हवा या निवडणुकीत फुग्यसारखी फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या निवडणुकीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा या निवणुकांवर परिणाम होणार असल्याचेही ते म्हणाले.लोकसभेत मोदींच्या नावावर मत मागितली. शिंदेच्या नावावर नाही मागितले. गाझा पट्टी वरील युद्ध मोदींनी थांबवलं मात्र देशांमध्ये नीटच्या परीक्षेत होणारा गोंधळ आणि पेपर फुटी त्यांना थांबवता आली नाही अशी टीकाही त्यांनी केली.

पावसात पोलीस भरती घेऊ नका असेच सांगितलेले असतानाही तुम्ही पावसात का घेतली? असा सवाल त्यांनी केला.राज्यात कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक राहिला नाही, ही परिस्थिती महाराष्ट्रात कधीच तयार झाली नव्हती, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले