ठाणे : महापालिका प्रशासनाने अवाजवी दराने केलेली जंबो खरेदी महापौर नरेश म्हस्के यांना योग्य वाटते. त्यामुळे महापौरांची तत्काळ टेंडर समितीवर नियुक्ती केल्यास महापालिकेची तिजोरी रिकामी होईल, असा टोला भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी महापौरांना लगावला आहे. महापालिकेच्या परवानगीने एमसीएचआय-जितो ट्रस्टने हॉस्पीटलच्या नावाखाली जमा केलेल्या कोट्यवधींचा हिशेब मिळालेला नाही. आता महापालिका विकणे आहे, अशा फलकाचे महापौरांनी उद्घाटन करावे, असे उपरोधिक आवाहनच नारायण पवार यांनी केले आहे.कोरोनाच्या निमित्ताने केलेल्या अनिर्बंध खरेदीचा हिशेब द्यायला महापालिका प्रशासन तयार नाही. या प्रकाराला महापौर म्हस्के पाठिशी घालत आहेत. सामान्य ठाणेकरांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत सवलत देण्यास तयार नाहीत, ही महापौरांची भूमिका स्वार्थी व दुटप्पी असल्याचीही टीका पवार यांनी केली आहे.राज्य सरकारने महापालिकेला दिलेल्या रेशनचे काही कार्यकर्त्यांनी स्वत:च्या नावावर वाटप केले. त्याबाबत चौकशीची मागणी महापौरांनी केली होती. त्यावर ते आता गप्प आहेत.बाळकूम येथील हॉटेलचा दर प्रत्येक रु मसाठी १५०० रु पये असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रतीरु म अडीच हजार रु पये मंजूर केले. या बिलाला आक्षेप आहे. कोरोनाबाधित डॉक्टरांची चांगल्या हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याची आवश्यकता होती. त्यांना मात्र अवाच्या सवा पैसे भरु न दुय्यम दर्जाच्या हॉटेलमध्ये पाठविण्यात आले.ठाणेकर वा-यावरमहापौरांनी सर्व ठाण्याचा प्रथम विचार करायला हवा होता. मात्र, महापौरांच्या स्वत:च्या प्रभागातील फुलपाखरु उद्यानात स्थापत्य कामांच्या नावाखाली २९ लाखांची कामे महासभेत मंजूर करण्यात आली. या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार असताना वाढीव खर्च कसा झाला, याकडेही नगरसेवक पवार यांनी लक्ष वेधले आहे.
‘आता ‘महापालिका विकणे आहे’ फलकाचे महापौरांनी उद्घाटन करावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 11:48 PM
महापालिकेच्या परवानगीने एमसीएचआय-जितो ट्रस्टने हॉस्पीटलच्या नावाखाली जमा केलेल्या कोट्यवधींचा हिशेब मिळालेला नाही. आता महापालिका विकणे आहे, अशा फलकाचे महापौरांनी उद्घाटन करावे, असे उपरोधिक आवाहनच नारायण पवार यांनी केले आहे.
ठळक मुद्दे नगरसेवक नारायण पवार यांचे उपरोधिक आवाहन हॉटेलचा दर प्रत्येक रुमसाठी दीड हजार असूनही अडीच हजार रुपये मंजूर