शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

कचऱ्यावरही आता मासिक शुल्क ५० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 10:54 PM

भाईंदर महापालिकेत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू

धीरज परब मीरा रोड : सरकारने अधिसूचना काढून घनकचरा, स्वच्छता व आरोग्य उपविधी अमलात आणल्याने त्यानुसार मीरा-भाईंदर महापालिकेने नागरिकांकडून कचरा शुल्क वसूल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मालमत्ता देयकांमध्ये समावेश करून घरांना शुल्क आकारण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. तर, वाणिज्यवापरात विविध वर्ग केले असल्याने त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या वर्षात प्रत्येक घराकडून नऊ महिन्यांचे ४५० रु. शुल्क आकारले जाणार आहे. पुढच्यावर्षी ६३० रु., तर प्रत्येकवर्षी त्यात पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे. पहिल्याच वर्षात निवासी मालमत्तांमधून साडेतेरा कोटी, तर वाणिज्य आस्थापनांकडून साडेअकरा कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे.

अधिसूचनेनुसार मीरा-भाईंदर महापालिकेने गेल्यावर्षी आकारलेले घनकचरा शुल्क रद्द ठरले आहे. मंजूर केलेल्या दरानुसार आता महापालिकेने कचरा शुल्कआकारणी करण्याचा निर्णय घेत त्याबाबत बैठक घेतली. मीरा-भार्इंदर महापालिका ड वर्गात असल्याने नागरिकांना घरातील कचºयाचे शुल्क द्यावे लागणार आहे. प्रत्येक घरासाठी महिन्याला ५० रुपये याप्रमाणे वर्षाला ६०० रुपये शुल्क भरावे लागेल. दुकाने, दवाखान्यांसाठी महिना ६० रुपये, उपाहारगृहे वा हॉटेल, फर्निचर, ऑटोमोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक आदींच्या शोरूम, गोदामांना व ५० खाटांपेक्षा कमी रुग्णालयांना महिना १२० रु.प्रमाणे वार्षिक शुल्क द्यावे लागणार आहे. लॉजिंग व हॉटेलना महिना १६० रु. शुल्क असेल. शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, सरकारी व निमसरकारी कार्यालये यांना प्रतिमहिना ९० रु. शुल्क भरावे लागेल. विवाह कार्यालय, मनोरंजन सभागृह, एक पडदा चित्रपटगृहासाठी प्रतिमहिना १०००, तर खरेदी केंद्रे व बहुपडदा चित्रपटगृहांसाठी १५०० रु. प्रतिमहिना आकारले जाणार आहेत. शहरातील फेरीवाल्यांनाही महिन्याला १५० रु. शुल्क द्यावे लागणार आहे. महापालिकेकडे एकूण ३ लाख ५८ हजार ७९५ मालमत्तांची नोंद असून त्यातील २ लाख ९६ हजार ३७४ मालमत्ता निवासी स्वरूपाच्या आहेत. ५७ हजार ७४३ मालमत्ता वाणिज्य स्वरूपाच्या, तर ४ हजार ६७८ मालमत्ता संमिश्र प्रकारच्या आहेत. निवासी मालमत्तांच्या देयकात कचराशुल्क समाविष्ट करून त्याची वसुली करणे सोपे जाणार आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक