शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘शाई’त बुडणाऱ्या गावांची संख्या आता वाढणार

By admin | Published: April 17, 2017 4:51 AM

शाई धरणाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने या धरणाची जागा बदलण्यासाठी जोरदार

सुरेश लोखंडे, ठाणेशाई धरणाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने या धरणाची जागा बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. शहापूर तालुक्यातील नामपाडाऐवजी सहा किमीवरील उमगाच्या दिशेने ढाड्रा गावाजवळ धरण बांधण्याचा नवा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यामुळे ५५ ऐवजी सुमारे ६५ गावपाड्यांना या धरणात जलसमाधी मिळणार आहे. धरणाची जागा बदलवून दोन पाडे वाचवत असल्याचा गवगवा शासन करीत आहे; पण त्या बदल्यात उगमाकडील १० मोठमोठ्या महसुली गावांना या नव्या प्रस्तावामुळे जलसमाधी मिळणार आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील प्रारंभीची ढाड्रा, गुंडा, साकुर्ली, पाचघर मठ येथून ते डोळखांब विभागातील डिहणे, पडगावपर्यंतची ४५ गावे या धरणात बुडणार आहेत. मुरबाड तालुक्यातील शिरोशी, वेळूक आदी १६ महसुली गावे आणि दोन्ही तालुक्यांतील पाडे आदी ६५ ते ६८ गावपाडे नवीन प्रस्तावामुळे शाई धरणात बुडणार आहे. यामुळे शाई धरण शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी संघर्ष तीव्र करीत गावोगाव मेळाव्यांचे आयोजन केल्याचे या संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारघडे यांनी सांगितले. शाईच्या जागेत बदल करून धरणाच्या वरच्या दिशेने ढाड्रा गावाजवळ नवीन जागा पाटबंधारे विभागाने निश्चित केल्याची चाहूल या शेतकऱ्यांना लागली आहे. या धरणाची जागा बदलवण्यात आली; मात्र उंची १८० फूट कायम ठेवली आहे. यामुळे शाई नदीच्या उगमापर्यंत हे पाणी पसरणार आहे. यात शहापूरच्या पाच मोठ्या ग्रामपंचायतींचे १५ गावपाडे १०० टक्के बुडणार, तर मुरबाडचे १३ गावे व पाडे बुडणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालकीची सुमारे तीन हजार ४० हेक्टर शेती बुडणार आहे. वनखात्याचे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रातील जंगल बुडणार आहे. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी एमएमआरडीए सुमारे ४५२ कोटी खर्चून शाई धरण बांधणार आहे. पण, सुमारे १० वर्षांपासून शेतकऱ्यांनी त्याविरोधात तीव्र संघर्ष सुरू ठेवला आहे. सध्या या धरणाच्या मालकीसाठी ठाणे महापालिका आघाडीवर आहे. वाढीव पाणीसाठा करण्यासाठी या धरणाची मूळ जागा बदलून नव्या जागेचा प्रस्ताव करण्यात आल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे; पण १४ छोटी बंधारे बांधण्याची तयारी दाखवणाऱ्या या शेतकऱ्यांनी शाई धरणाचा विरोध कायम ठेवला आहे.