शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

आता पाच दिवसांचा आठवडा

By admin | Published: April 27, 2017 12:00 AM

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यास शासन अनुकूल असून कार्यालयांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांनादेखील

ठाणे : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यास शासन अनुकूल असून कार्यालयांबरोबरच शाळा आणि महाविद्यालयांनादेखील ५ दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती मंगळवारी संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे आणि सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिली. अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीने आयोजित राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ठाणे नियोजन भवनात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना भाटकर यांनी देशातील अनेक राज्यांनी पाच दिवसांचा आठवडा ही संकल्पना स्वीकारली आहे. ९ राज्यांनी ती प्रत्यक्ष अमलात आणली आहे. २१ एप्रिल रोजी संघटनेस यासंदर्भातले मुख्यमंत्र्यांचे पत्रही प्राप्त झाले आहे. याची चाचपणी सुरू आहे. याशिवाय, सातवा वेतन आयोग केंद्राप्रमाणे राज्यासाठीही १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्याबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असून बक्षी समितीचा अहवाल मिळाला की, कार्यवाही होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)