ठाणे : ऐतिहासिक लेखन करत असताना लेखकाची निर्मिती हीच महत्त्वाची असते. काही ठिकाणी तो तर्क देत असतो. इतिहास हा विषय असे आपल्या मनावर शालेय जीवनापासून बिंबवले जाते. त्याला सरकार व शिक्षण खाते जबाबदार आहे, असे डॉ सच्चिदानंद शेवडे यांनी सांगितले. मुलांना सनावळीत अडकवून न ठेवता इतिहास हा विषय रंजक व गोष्टीवेल्हाळ पद्धतीने शिकवला पाहिजे. रहस्य व साहसकथा वाचल्यावर वाचक इतिहासाच्या पुस्तकाकडे वळतो. ओगले यांनी गांधी हत्या हे पुस्तक लिहिले आहे. त्याला प्रकाश आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे ते पुस्तक वाचले पाहिजे. इतिहासाने जातीपातीमध्ये फाटाफूट होणार असेल, तर आपल्या शिक्षणाचा उपयोग काय, असा सवाल शेवडे यांनी यावेळी केला. ओगले यांचे महाराज यशवंतराव होळकर हे पुस्तक वाचले पाहिजे. होळकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते. ते का वादग्रस्त होते, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. एकीकडे बाजीराव पेशवे हे व्यसनी होते, असे इतिहासकारांनी रंगवले आहे. ते व्यसनी होते तर ते ३७ वर्षे कसे जगले. त्यांनी लढाया कशा केल्या, हे प्रश्नही आपल्याला पडले पाहिजेत.
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, संजीव ब्रह्मे, ‘व्यास’चे अध्यक्ष निलेश गायकवाड, मार्गदर्शक श्री.वा. नेर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश भडसावळे व प्रास्ताविक गायकवाड यांनी केले.
आपल्याकडील इतिहासलेखनाला दोन बाजू आहेतएक इतिहास ब्रिटिशांनी लिहून ठेवला आहे. दुसरा देशीय इतिहासकारांनी लिहिला आहे. आता जातीयवादी इतिहास लिहिला जात आहे. इतिहासकारांनी इतिहासातील ही जळमटे दूर केली पाहिजेत. ही जबाबदारी इतिहासलेखन करणाऱ्यांची आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी येथे केले. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय व व्यास क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांचा पुस्तक आदानप्रदान महोत्सव संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने लेखक अनंत ओगले लिखित महाराज यशवंतराव होळकर या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शेवडे यांनी उपरोक्त विधान केले.
मोदी अभ्यासाचा विषयमोदी हा अभ्यासाचा विषय आहे. मोदींनी २०१४ पूर्वीच जातीपातीचे राजकारण सोडले आहे. मोदींना ३०० जागा मिळणार, हे पत्रकारांना समजले नाही. त्यांनी पत्रकारांशी बोलण्याऐवजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात थेट जनतेशी संवाद साधत मतदारांना बांधून ठेवले. मोदींनी प्रचंड विरोध केल्याने ते अधिक स्ट्राँग झाले, असे शेवडे यांनी यावेळी सांगितले.