कल्याण : आंबिवलीतील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी देण्याचा विषय एनसीएलएटी लवादाकडे प्रलंबित आहे. मात्र, महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या कामगार प्रतिनिधींनी कंपनीच्या जागेचे बाजारभाव मूल्य उपनिबंधक कार्यालयातून काढले आहे. त्यानुसार कंपनीच्या जागेची किंमत पाच हजार कोटी असून, या जागेच्या विक्रीतून कामगारांची देणी सहज फेडता येतील, असा दावा युनियनचे अध्यक्ष भूषण सामंत यांनी केला आहे.
सामंत म्हणाले, थकीत देणी मिळावीत, यासाठी कामगारांच्या वतीने युनियन १० वर्षांपासून लढा देत आहे. एनसीएलएटीच्या मुंबई लवादाच्या निकालानुसार कामगारांना १०० कोटी रुपये द्यावेत. ही रक्कम प्रत्यक्षात ३२ कोटी १६ लाख रुपये इतकी होती. त्यावर आक्षेप घेतल्यावर १०० कोटी देण्याचे ठरले. मात्र, चार हजार कामगारांची देणी देण्यासाठी १०० कोटींची रक्कम अत्यंत अपुरी आहे. प्रत्यक्षात थकीत देणीची रक्कम जवळपास एक हजार कोटी रुपये असून, ती देण्यात यावी. त्यामुळे मुंबई लवादाच्या निकालाविरोधात दिल्ली लवादाकडे दाद मागितली आहे. यासंदर्भात १४ आॅक्टोबरला सुनावणी होणार आहे. केंद्रीय लवादाकडूनही कामगारांच्या बाजूने निकाल न लागल्यास संघटना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.कामगारांची थकीत देणी असताना कंपनी व्यवस्थापनाने जमीन विक्रीसंदर्भात काही करार केले असल्यास ते उघड करावेत, अशी आमची मागणी आहे. मात्र, ते उघड केले जात नाहीत. करार उघड न करताच आदानी कंपनीकडून कसले सर्वेक्षण केले जात आहे, असा प्रश्न सामंत यांनी विचारला आहे.सरकारने हस्तक्षेप करावाच्कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते दत्ता सामंत यांनी ५० बंद कंपन्यांमधील कामगारांना देणी मिळावीत, यासाठी लढा दिला. तोच लढा युनियनने सुरू ठेवला आहे.च्सध्या सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू आहे. मात्र, दत्ता सामंत हत्या प्रकरणाचीही सरकारने सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भूषण सामंत यांनी केली आहे.च् एनआरसीसह ५० बंद कंपन्यांच्या कामगारांची देणी देण्याच्या विषयी राज्य सरकारने हस्तक्षेप करावा. कामगारमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.