ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी २९ नवे कोरोनाचे रुग्ण समोर आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३९३ झाली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक १४ तर मीरा भाईंदर - १३ आणि कल्याण डोंबिवली येथे २ नवे रुग्ण आढळले.ठाणे पालिका कार्यक्षेत्रात रविवारी सापडलेल्या १४ नव्या रुग्णांपैकी सात मुंब्य्रातील तर पाच राबोडी तसेच तीन रुग्ण शहरातील आहेत. यामध्ये महिला आणि पुरु षांचे प्रमाण हे समसमान आहे. नव्या रुग्णांमध्ये १0 ते १२ वर्षे वयोगटातील लहान मुले आहेत. यामुळे ठामपा कार्यक्षेत्रातील रुग्णांची संख्या १४४ झाली आहे. कल्याण डोंबिवलीतही दोन रुग्ण सापडले आहेत. ते नवे रुग्ण कल्याण पूर्व येथील आहेत. या रुग्णांमुळे केडीएमसीतील रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. मिराभार्इंदर येथेही १३ रुग्ण आढळून आल्याने तेथील संख्या ही ८२ इतकी झाली. त्या व्यतिरिक्त भिवंडी, उल्हासनगर, नवीमुंबई, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे ग्रामीण या ठिकाणी रविवारी एकही रुग्ण सापडला नाही.सहा रुग्ण परतले घरीठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी सहा रुग्ण रविवारी ठणठणीत होवून घरी परतले. तत्पूर्वी रु ग्णा लयाच्या आवारात त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी काळजी घेण्याबाबत सल्ला दिला. यामध्ये विरार आणि डोंबिवली येथील प्रत्येकी दोन तर, अंबरनाथ आणि पालघर येथील प्रत्येकी एक अशा सहा रुग्णांचा समावेश आहे.
CoronaVirus: ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४00च्या जवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 3:06 AM