ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ५६८ नव्या रुग्णांची सोमवारी वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या आता एक लाख ६० हजार २७१ झाली आहे. तर, २९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता चार हजार १७२ झाली आहे.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३४० रुग्ण आढळले आहेत. तर, आठ जणांचा मृत्यू झालेला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ४१३ रुग्णांची नव्याने वाढ झाली असून पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात दोन मृत्यूंसह ४४ नवे रुग्ण आढळले आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात सर्वात कमी फक्त १५ बाधित आढळले असून एक मृत्यू झाला आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १५८ रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.अंबरनाथमध्ये ३१ रुग्णांची वाढ झाली आहे. मात्र, एकाचाही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये ८२ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात १४० रुग्णांची वाढ झाली आहे. तर, दोन मृत्यू झाले आहेत.वसई-विरारमध्ये१३४ नवे रुग्ण1वसई : वसई-विरार शहरात सोमवारी दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नवीन बाधित रुग्णसंख्या १३४ ने वाढली आहे. तर दिवसभरात ११५ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. सध्या शहरात २,३५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.रायगडमध्ये ४२६ नव्या कोरोना रु ग्णांची नोंद2अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी ४२६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ४१ हजार ९५८ वर पोचली आहे. तर दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून ६५१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.नवी मुंबईत कोरोनाबळींची संख्या ७०३ वर3नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला. तर ३४५ नवीन रूग्ण आढळले असून ३६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.