ठाणे : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. बुधवारी ठाणे जिल्ह्यात ४२७ रुग्णांची तर ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २ लाख ४० हजार २०३ तर, मृतांची संख्या आता ५ हजार ९०१ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १२१ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५४ हजार ५७५ तर, १२९४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ९३ रुग्णांची तर, ३ जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत ११९ रुग्णांसह २ जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये ३३ रुग्णांची नोंद झाली आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात ३ रुग्णांची नोंद झाली आहे. उल्हासनगर मधे १८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथमध्येही १० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये २३ रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात ७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ५६९ झाली आहे. तर मृतांचा आकडा ५७७ झाला आहे.